कोरोनाचा विळखा सैल, म्युकरमायकोसिसचा कहर वाढता, मालेगावात ब्लॅक फंगसने तिघांचा बळी

मालेगाव शहरातील एक आणि ग्रामीण भागातील दोन अशा तीन रुग्णांचा Mucormycosis मुळे मृत्यू झाला आहे. (Malegaon Mucormycosis Black Fungus )

कोरोनाचा विळखा सैल, म्युकरमायकोसिसचा कहर वाढता, मालेगावात ब्लॅक फंगसने तिघांचा बळी
म्युकरमायकोसिस
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 7:29 AM

मालेगाव : मालेगाव शहर आणि तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होत असताना म्युकरमायकोसिसचा कहर (Mucormycosis) वाढत आहे मालेगाव शहर आणि परिसरात म्युकरमायकोसिसचे 50 पेक्षा जास्त संशयित रुग्ण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यापैकी तिघा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. (Malegaon witnessed Three Deaths of Mucormycosis Black Fungus Post COVID Complication)

मालेगाव सामान्य रुग्णालयात आतापर्यंत सात रुग्ण दाखल झाले असून शहरातील एक आणि ग्रामीण भागातील दोन अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर मालेगावात उपचार सुरु आहेत. सुदैवाने एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे. मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूची संख्या सध्या कमी असली तरी त्या तुलनेत म्युकरमायकोसिसचे आढळून येणारे रुग्ण ही गंभीर बाब असल्याचे नेत्ररोग, दंतरोगतज्ज्ञांनी सांगितले आहे.

उपाययोजना आणि जनजागृती करण्याच्या सूचना

दरम्यान, म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून उर्वरित रुग्णांची माहिती घेण्याचे काम महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी येथील शासकीय विश्रामगृहावर म्युकरमायकोसिस या आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहून तातडीने आढावा बैठक घेत विविध उपाययोजना आणि जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी हा काय प्रकार आहे?

म्युकरमायकोसिस हे एक फंगल इन्फेक्शन आहे, जे कोरोना विषाणूमुळे उद्भवते. हा संसर्ग सामान्यत: नाकातून सुरू होतो. जे हळूहळू डोळ्यांपर्यंत पसरतो. म्हणूनच, संक्रमण होताच त्यावर उपचार करणे फार महत्वाचे आहे.

सर्वाधिक धोका कोणाला?

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये केवळ काही विशिष्ट परिस्थितीत म्युकरमायकोसिस होण्याचा धोका वाढतो. अनियंत्रित मधुमेह, स्टिरॉइड्समुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ आयसीयू किंवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट राहणे, इतर कोणताही रोग, पोस्ट प्रत्यारोपण (ऑर्गेन ट्रान्सप्लांट) किंवा कर्करोग झाल्यास काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो.

काळ्या बुरशीची लक्षणे

काळ्या बुरशीमध्ये बर्‍याच प्रकारची लक्षणे दिसतात. डोळे लाल होणं किंवा डोळे आणि आसपास वेदना होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेताना त्रास होणे, उलट्या होणे आणि त्यावाटे रक्त पडणं किंवा मानसिक स्थितीत बदल होणे ही काळ्या बुरशीची प्रमुख लक्षणे आहेत. (Malegaon Mucormycosis Black Fungus)

बचाव कसा करायचा?

काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी धुळीच्या ठिकाणी मास्क घाला. माती किंवा खत यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात येत असाल तर शूज, ग्लोव्हज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊझर घाला. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मधुमेहावर नियंत्रण मिळवा, इम्यूनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉइड्सचा वापर टाळा

तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवा. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच स्टिरॉइड्स वापरा. ऑक्सिजन थेरपीच्या वेळी, ह्यूमिडिटीफायरसाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा. आवश्यकतेनुसार अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे वापरली पाहिजेत.

संबंधित बातम्या :

कोरोनाची तिसरी लाट आलेल्या अमरावतीत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

Black Fungus Mucormycosis Symptoms : काळ्या बुरशीची लक्षणे आणि उपाय काय?

(Malegaon witnessed Three Deaths of Mucormycosis Black Fungus Post COVID Complication)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.