फेसबूकवरुन घट्ट मैत्री झाली, मैत्रीचे प्रेमात रूपांतर झालं…तुटलेला संसार जोडला जात होता पण नंतर जे काही समोर आलं ते धक्कादायक आहे
विवाहित तरुणी आपल्या पतीपासून काही महिन्यांपासून विभक्त राहत होती, त्यामध्ये रोहित करण सिंग पांचाल यांच्यासोबत अविवाहित महिलेची फेसबूकवरुन मैत्री झाली होती त्यानंतर मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले होते.
नाशिक : सोशल मीडियावरील मैत्री, त्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर आणि त्यानंतर थेट प्रकरण पोलीस ठाण्यात… अशा विविध घटना तुम्ही ऐकल्या असती किंवा तुमच्या आजूबाजूला घडल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण नाशिकमधील एक घटना ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने रोहित करण सिंग पांचाल याच्या विरोधात तक्रार दिली होती त्यांनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलीस तपासात याबाबत समोर आलेली बाब ऐकून पोलिसांना आश्चर्या वाटले आहे. नाशिकमधील एक विवाहित महिला पतीपासून विभक्त राहत होती, त्यामध्ये तीची दिल्ली येथील रोहित करण सिंग पांचाल या व्यक्तीसोबत फेसबूकवरुन मैत्री झाली होती. त्यांच्यामधील सुरू झालेल्या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले होते. रोहित करण सिंग पांचाल हा तक्रारदार महिलेला भेटण्यासाठी येत होता. त्यामध्ये त्याने भेटीदरम्यान दोघांचे खाजगी फोटो काढले होते. अनेकदा व्हिडिओ कॉलवर बोलत असतांना स्क्रीनशॉटस काढले होते.
विवाहित तरुणी आपल्या पतीपासून काही महिन्यांपासून विभक्त राहत होती, त्यामध्ये रोहित करण सिंग पांचाल यांच्यासोबत अविवाहित महिलेचे संबंध होते.
मात्र, नातेवाईकांच्या मदतीने तक्रारदार अविवाहित महिलेने रोहित करण सिंग पांचाल याला पती सोबत पुन्हा मी राहणार असल्याने आपले संबंध संपले असे सांगितले होते.
हीच बाब रोहित करण सिंग पांचाल याला खटकली, त्याने पतीच्या नातेवाईकांना आणि तक्रारदार महिलेच्या नातेवाईकांना खाजगी फोटो आणि स्क्रीनशॉट सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविण्यास सुरुवात केली.
रोहित करण सिंग पांचाल याने इथवरच न थांबता तक्रारदार महिलेच्या पतीलाही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले, आणि सोशल मिडियायवर व्हायरल गेले त्यावरून पुन्हा सुरू होणारा संसार मोडून गेला.
तक्रारदार महिलेने याबाबत थेट पोलीस स्टेशन गाठून रोहित करण सिंग पांचाल याच्या विरोधात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.