Medical कॉलेजचा पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी होणार सुरू; राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुखद धक्का!

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील जागा वितरणाबाबत शेवटच्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका व इमारत बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून येत्या आठवड्यात सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी.

Medical कॉलेजचा पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी होणार सुरू; राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुखद धक्का!
Maharashtra University of Health Sciences, Nashik
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 9:42 AM

नाशिकः राज्यभरातील विद्यार्थ्यांना एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी. वैद्यकीय (Medical) महाविद्यालयाचा (College)पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन संस्थेच्या कामकाजाबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण, डेप्युटी रजिस्टार डॉ. एस. एच. फुगरे आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आठ दिवसांत नियोजन सादर करा

बैठकीत पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील जागा वितरणाबाबत शेवटच्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका व इमारत बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून येत्या आठवड्यात सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. त्याचप्रमाणे या विद्यालयाच्या इमारतीचे डिझाइन नियोजनबद्ध असणे आवश्यक आहे. तसेच त्याअंतर्गत सर्व अद्यावत सेवा सुविधा उपलब्ध असाव्यात, अग्निशमन यंत्रणा, स्प्रिंक्लर, हिरवळ याबाबींचा देखील नवीन इमारतीत करण्यात यावा, याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल. याबाबतचे नियोजन तयार करून येत्या आठ दिवसांत सादर करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

लासलगाव रस्त्याबाबत सूचना

लासलगाव बाह्यवळण रस्ता भूसंपादनाबाबत रेडिकेनर दरानुसार सर्वांना समान तत्वावर जमिनीचा मोबदला देण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य निर्णय घेण्यात येईल, अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. याबैठकीत लालसगाव, विंचूर व टाकळी विंचूर या गावातील शेतकरी समवेत भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदला दराबाबत चर्चा केली. याबैठकीस उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, निफाड प्रांताधिकारी अर्चना पठारे, नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक दीपाली पाटील व सहाय्यक नगररचनाकार सतीश चव्हाण आदी उपस्थित होते.

मेडिकल कॉलेजचे इमारतीचे डिझाइन नियोजनबद्ध असणे आवश्यक आहे. तसेच त्याअंतर्गत सर्व अद्यावत सेवा सुविधा उपलब्ध असाव्यात, अग्निशमन यंत्रणा, स्प्रिंक्लर, हिरवळ याबाबींचा देखील नवीन इमारतीत करण्यात यावा. याबाबतचे नियोजन तयार करून येत्या आठ दिवसांत सादर करावे.

– छगन भुजबळ, पालकमंत्री

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.