लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याकडे कोट्यवधीची संपत्ती; ३२ तोळे सोने, ५०० च्या नोटांचा ढिग आणि बरेचकाही

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तब्बल ८५ लाख रुपये रोख रक्कम आणि ३२ तोळे सोनं अशी मालमत्ता आढळली आहे. नाशिक एसीबीने जानेवारीपासून ते आतापर्यंतच्या केलेल्या कारवाईत ही सर्वात जास्त रक्कम आढळून आलीय.

लाचखोर शिक्षणाधिकाऱ्याकडे कोट्यवधीची संपत्ती; ३२ तोळे सोने, ५०० च्या नोटांचा ढिग आणि बरेचकाही
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 3:10 PM

चैतन्य गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक : काही सरकारी अधिकारी बिनधास्तपणे लाच घेतात. ही बाब समोर येते. काही दिवस बदनामी होते. त्यानंतर ते पुन्हा नोकरीवर रूजू होतात. पुन्हा तोच कित्ता सुरू होतो. त्यामुळे लाचखोर कर्मचाऱ्यांची हिंमत वाढत जाते. यासाठी अशा लाचखोरांना नोकरीतून बडतर्फे करणे आवश्यक आहे. पण, काही तांत्रिक अडचणी तपासात येतात. त्यानंतर ते पुन्हा खुलेआम लाच घेतात. खऱ्या अर्थाने या लाचखोरांच्या संपत्तीचा लीलाव करून सार्वजनिक कामासाठी वाटप केले पाहिजे. पण, सद्यातरी अशी व्यवस्था दिसत नाही.

लाचखोर सुनीता धनगरकडे कोट्यवधीची संपत्ती

नाशिकमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली. नाशिक महापालिका शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना ५० हजारांची तर लिपिकाला ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. यात कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडली.

हे सुद्धा वाचा

८५ लाख रोख, ३२ तोळे सोने खाणार होती का?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तब्बल ८५ लाख रुपये रोख रक्कम आणि ३२ तोळे सोनं अशी मालमत्ता आढळली आहे. नाशिक एसीबीने जानेवारीपासून ते आतापर्यंतच्या केलेल्या कारवाईत ही सर्वात जास्त रक्कम आढळून आलीय. तसेच सुनीता धनगर यांच्या नावावर दोन फ्लॅट आणि एक प्लॉट असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.

दोन फ्लाट आणि तिसरा फ्लॅट

सुनिता धनगर हिचा एक फ्लॅट टिळकवाडी आणि दुसरा फ्लॅट उंटवाडी येथे, तर प्लॉट आडगाव येथे असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिली. तसेच लिपिक नितीन जोशी याच्या घराचे देखील झडती घेण्यात आली. मात्र त्यात काहीही आढळून आले नाही.

काय आहे प्रकरण?

नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली. तक्रारदार निलंबित मुख्याध्यापकाला कामावर रुजू करायचे होते. त्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी ५० हजार रुपये लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर हिने मागितले. याप्रकरणी धनगर हिला ४५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.