AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | चक्कर येऊन पडल्याने नाशिकमध्ये एकाच दिवशी 9 जणांचा मृत्यू

अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा एका दिवसात नऊवर गेला आहे. ( Nashik people dies feeling Dizzy)

VIDEO | चक्कर येऊन पडल्याने नाशिकमध्ये एकाच दिवशी 9 जणांचा मृत्यू
नाशकात चक्कर-मळमळीच्या लक्षणांनंतर नागरिकांचा मृत्यू
| Updated on: Apr 16, 2021 | 9:28 AM
Share

नाशिक : चक्कर येऊन पडल्याने नाशिक शहरात एकाच दिवसात 9 जण दगावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वीही चक्कर आल्याने चौघा जणांचा 24 तासांच्या काळात मृत्यू झाला होता. नाशिकमधील नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Nashik 9 people dies on same day after feeling Dizzy)

उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचा आकडा एका दिवसात नऊवर गेला आहे. तर गेल्या तीन दिवसांतील आकडा 13 वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे मृतांमध्ये तरुणांचाही समावेश आहे. याआधी कोणाचा रस्त्याने पायी जाताना मृत्यू झाला होता, तर कोणाला राहत्या घरीच चक्कर आली होती.

गेल्या काही दिवसात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. नाशिक शहराचं तापमान वाढून 40 अंशाच्या पार पोहोचलं आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज याआधीही वर्तवण्यात आला होता. परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चक्कर-मळमळ लक्षणांकडे दुर्लक्ष नको

या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चक्कर येणे, मळमळ होणे यासारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्ला नाशिक शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतानाही काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

गेल्या आठवड्यात चौघांचा मृत्यू

चक्कर येऊन पडल्याने शनिवारी नाशिकमध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. इंदिरानगर, उपनगर, श्रमिकनगर आणि देवळाली गावात या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Nashik 9 people dies on same day after feeling Dizzy)

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

नाशकात कोरोना नियमांची पायमल्ली, रामकुंडावर पूजाविधीसाठी मोठी गर्दी

नाशिकमध्ये चक्कर येऊन पडल्याने एका दिवसात चौघांचा मृत्यू, नेमकं कारण काय?

ना शववाहिनी मिळाली, ना मदत, माऊलीच्या पार्थिवासह कार चालवत मुलगी स्मशानभूमीत

(Nashik 9 people dies on same day after feeling Dizzy)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.