Nashik : विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पालकांनी घेतला टोकाचा निर्णय, शिक्षकांनी दिली मंजुरी
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांचा मोठा निर्णय, शिक्षकांनी दिला होकार, चांगला निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थांचं सगळीकडे कौतुक
नाशिक : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना (Student) ऑनलाईन शिक्षण (Online Education) घ्यावं लागलं, तेव्हापासून प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल आहे. मुलं अभ्यास करीत नसल्याची ओरड अनेकदा पालक करीत असतात. त्याचबरोबर सतत मोबाईलमध्ये असल्यामुळे नाशिकमधील (Nashik) देवळा तालुक्यातील दहिवड या गावात शाळेच्या वेळेत कुठल्याही विद्यार्थ्याला मोबाईल वापरता येणार नाही असा चांगला निर्णय पालकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाचं सगळीकडे कौतुक करण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर ठेवता यावे यासाठी नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दहिवड या गावात ग्रामस्थांनी एकत्रित येत घेतला महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोबत मोबाईल आणू नये, आणि आणला तरी तो शाळेच्या वेळेत वापर करू नये असा निर्णय नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवडच्या ग्रामस्थांनी घेतला आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी करण्याआगोदर ग्रामस्थांच्या सह्या असणारे निवेदन गावातील सर्व शैक्षणिक संस्थांना देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांमध्ये सुध्दा आनंदाचं वातावरण आहे. आम्ही तातडीने अंमलबजावणी करु असं आश्वासन त्यांना ग्रामस्थांना दिलं आहे.