Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांच्या विश्वासू सहकाऱ्याने करुन दाखवलं, शिवसेनेत इनकमिंग सुरु

सुधाकर बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळून आठवडा होत नाही, तोच भाजपला सुरुंग लागला आहे.

संजय राऊतांच्या विश्वासू सहकाऱ्याने करुन दाखवलं, शिवसेनेत इनकमिंग सुरु
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 1:00 PM

नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळून आठवडा होत नाही, तोच भाजपला सुरुंग लागला आहे. भाजपचे काही बडे नेते आणि नगरसेवक पुढच्या आठवड्यात सेना प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Nashik BJP Leaders to join Shivsena ahead of Balasaheb Sanap entering saffron party)

माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकत सोमवारीत भाजपमध्ये घरवापसी केली. मात्र सानप यांच्या प्रवाशाने भाजपमधील अनेक जण नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातूनच भाजपचे नाशकातील दिग्गज नेते आणि नगरसेवक शिवबंधन हाती बांधण्याची शक्यता आहे. भाजपच्या उद्योग आघाडीचे पदाधिकारीही मुंबईत शिवसेना प्रवेश करणार आहेत. प्रवेशावेळी शिवसेना कार्यालयाला ते अॅम्ब्युलन्स भेट देणार आहेत.

भाजपची डोकेदुखी वाढली

बाळासाहेब सानप यांनी दोन वर्षात ती पक्ष बदलले. मग अशा व्यक्तीला पक्षात प्रवेश का दिला जातोय? असा सवाल भाजपमधील एका गटाकडून विचारला जात होता. मात्र, त्यानंतरही सोमवारी मुंबईत सानप यांचा प्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर आता नाशिक भाजपात मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे.

धुळ्यातही सुरुंग

भाजप कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मनोज मोरे लवकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मोरे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले होते. मनोज मोरेंसोबत अनेक कार्यकर्तेही सेनेत जाण्याची शक्यता आहे.

कोण आहेत सुधाकर बडगुजर?

सुधाकर बडगुजर हे नाशिक महापालिकेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. अभ्यासू आणि आक्रमक भूमिकेसाठी ते ओळखले जातात. नाशकात शिवसेनेचा महापौर असेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. (Nashik BJP Leaders to join Shivsena ahead of Balasaheb Sanap entering saffron party)

संजय राऊत काय म्हणाले होते?

नाशिकमधील बदलाविषयी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढण्याचा आमचा विचार आहे. बाकी निवडणुका तुम्ही पाहिल्याच आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली. पहिल्यांदाच आम्ही एकत्र आलो आणि इतरांचे बालेकिल्ले ढासळले, असा खोचक टोला लगावतानाच जनतेचा कौल महाविकास आघाड%

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.