नाशिकमध्ये कारसाठी विवाहितेचा छळ; मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, पती सैन्य दलात
नाशिकमधल्या (Nashik) काजीसांगवी (ता. चांदडव) येथे कार घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली. त्यानंतर या विवाहितेचा मृतदेह चांदवडच्या एका विहिरीत आढळून आला. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या लेकीचा खून केला. मृतदेह विहिरीत फेकला, असा आरोप मृत मुलीच्या कुटुंबाने केला आहे.
नाशिकः नाशिकमधल्या (Nashik) काजीसांगवी (ता. चांदडव) येथे कार घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करत विवाहितेचा छळ केल्याची घटना घडली. त्यानंतर या विवाहितेचा मृतदेह चांदवडच्या एका विहिरीत आढळून आला. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या लेकीचा खून केला. मृतदेह विहिरीत फेकला, असा आरोप मृत मुलीच्या कुटुंबाने केला आहे. अश्विनी ठाकरे असे त्या विवाहितेचे नाव असून, याप्रकरणी नवरा,सासू, सासरे आणि 2 नणंदच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अश्विनीचा पती हा सैन्य दलात आहे. या प्रकरणी विवाहितेचे वडील रामदास एकनाथ सरोदे (रा. नांदुरखुर्द ता. निफाड) यांनी चांदवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, त्यांची मुलगी अश्विनी हिचे लग्न 15 फेब्रुवारी 2021 रोजी काजीसांगवी येथील सचिन दिलीप ठाकरेशी झाले. पती (husband) सचिन सैन्य दलात कार्यरत आहे. मात्र, लग्न झाल्यापासून पती सचिन ठाकरे, सासू जयाबाई ठाकरे हे अश्विनीला कार (Car) घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत म्हणून त्रास देत होते.
दीडच महिन्यापूर्वी 1 लाख 30 हजार दिले
मुलीचा होणारा छळ पाहून अश्विनीच्या वडिलांनी दीड महिन्यापूर्वी सासरच्या मंडळींना 30 हजार रुपये दिले होते. तसेच मेव्हणे परशराम निवृत्ती पवार यांच्याकडून एक लाख रुपये उसने घेऊन सासरे दिलीप ठकाजी ठाकरे यांच्याकडे दिले होते. मात्र, उर्वरित पैसे न मिळाल्यामुळे अश्विनीचा छळ सुरू होता. या प्रकरणी नणंद पूनम मनोज गुंजाळ, ज्योती निवृत्ती पगार (रा. नाशिक), वर्षा अमोल शिरसाठ (रा. मुसळगाव ता. सिन्नर), मामे सासरे बाबूराव रेवजी शिंदे (रा. रामपूर नैताळे ता. निफाड) यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
आठवड्यातील दुसरी घटना
नाशिक जिल्ह्यात विवाहिता मृत्यूची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी पतीचे संन्यास वेड आणि सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कळवण तालुक्यातल्या अभोणा येथे घडली आहे. विशाखा शैलेश येवले असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अभोणा पोलिसांत पती व सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, विशाखाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विशाखाचे कुटुंबीय व गावकरी करीत आहेत.
इतर बातम्याः