नाशिक-दिल्ली हवाहवाई; लवकरच सुरू होणार विमानसेवा!

विमान प्रवासाबाबतचे कोरोना निर्बंध आणखी शिथिल झाल्यानंतर आणि दिल्लीमध्ये टाइम स्लॉट मिळाल्यानंतर नाशिक-दिल्ली (Nashik-Delhi) विमानसेवा (flight) लवकरच सुरू होणार आहे.

नाशिक-दिल्ली हवाहवाई; लवकरच सुरू होणार विमानसेवा!
नाशिक-दिल्ली विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे.
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 3:21 PM

नाशिकः विमान प्रवासाबाबतचे कोरोना निर्बंध आणखी शिथिल झाल्यानंतर आणि दिल्लीमध्ये टाइम स्लॉट मिळाल्यानंतर नाशिक-दिल्ली (Nashik-Delhi) विमानसेवा (flight) लवकरच सुरू होणार आहे. डबघाईस आलेल्या जेट एअरवेजसोबत इंडिगो कंपनीनेही त्यासाठी तयारी केली आहे. (Nashik-Delhi flight to start soon, waiting for corona restrictions to be relaxed)

कोरोनाच्या दोन लाटेने सारे जग हादरून गेले. देशात कडक टाळेबंदी लागू करण्यात आली. महाराष्ट्रातही हेच नियम लागू करण्यात आले. त्यामुळे विमान प्रवास, एसटी प्रवास साऱ्यांवरच बंदी आणण्यात आली. अनेकांना काही तातडीच्या कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असले तरी पास काढावा लागायचा. आता या निर्बंधात शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र, अजूनही विमान प्रवास सुरळीत झाला नाही. यापूर्वी केंद्र सरकारने विमान कंपन्यांना क्षमतेच्या 65 टक्के विमान वापरायला परवानगी दिली होती. या निर्बंधात सध्या तरी शिथिलता आणली असून, आता 72 टक्के विमान वापरायला परवानगी दिली आहे. मात्र, यात अजून शिथिलता येण्याची गरज आहे. त्यानंतरच विमानसेवा सुरळीत सुरू होणार आहे. दरम्यान, नाशिक येथून सध्या पुणे, बेळगाव, अहमदाबादला विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. सोबतच स्टार एअर कंपनीची नाशिक-बेळगाव विमानसेवा सुरू आहे. डबघाईस आलेल्या जेट एअरवेजनेही 22 सप्टेंबरपासून सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांची नाशिक-दिल्ली सेवा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

इंडिगोही शर्यतीत

जेट एअरवेजची नाशिक-दिल्ली विमानसेवा बंद पडली होती. त्यामुळे दुसऱ्या कंपनीने नाशिक-दिल्ली विमान सुरू करावे, यासाठी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यानंतर उडाण योजनेंतर्गत इंडिगो कंपनीला नाशिक-दिल्ली विमान सेवा सुरू करण्यात परवानगी मिळाली. येत्या 25 सप्टेंबरपासून ही सेवा सुरू होणार होती. मात्र, दिल्ली विमानतळावर विमान उतरण्यासाठी आणि उड्डानासाठी कंपनीला अजून तरी वेळ मिळाली नव्हती. नागरी उड्डाण मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर इंडिगोच्या विमानाचा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय कोरोनाचे विमान प्रवास निर्बंध पाहता ही सेवा कधी सुरू होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दिल्लीला प्रतिसाद

नाशिककरांनी दिल्लीच्या विमान सेवेला उदंड प्रतिसाद दिला होता. पुणे, बेळगाव, अहमदाबादपेक्षाही या विमानात प्रवासी संख्या जास्त होती. नाशिकहून रेल्वेने अडीच-तीन तासांमध्ये मुंबई गाठता येते. मात्र, दिल्लीची तसे नाही. हे पाहता खासदार हेमंत गोडसे यांनीही ही सेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. (Nashik-Delhi flight to start soon, waiting for corona restrictions to be relaxed)

इतर बातम्याः

कुबेराचं धन महाग…नाशिकमध्ये सोन्याला झळाळी!

नाशिकः गंगापूर धरण फुल्ल; आज दुपारी एकपासून पाण्याचा 6000 क्युसेक्स विसर्ग सुरू

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.