नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय, लॉन्स फेडरेशनची स्थापना; Corona संकटातून बाहेर काढण्यासाठी चर्चा
महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय व लॉन्स फेडरेशनच्या राज्य कार्यकारिणीत सर्व जिल्हयांतील पदाधिकार्यांना स्थान देताना मोठ्या महापालिका क्षेत्रातून 3 तर लहान जिल्हयामधून 2 पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. यात एक अध्यक्ष, प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे 6 उपाध्यक्ष तसेच 1 सेक्रेटरी, सहसेक्रेटरी, खजिनदार याप्रमाणे 10 पदाधिकार्यांची कोअर कमिटी तयार करण्यात आली.
नाशिकः कोरोनामुळे (Corona) गेल्या तीन वर्षांपासून अनेक व्यवसायांवर परिणाम झाला. उद्योग क्षेत्र कोलमडून पडले. त्यात लग्न आणि मंगल कार्यालयांवर बंदी होती. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योगांचेही मोठे नुकसान झाले. भविष्यात असे संकट आले, तर कसे हा विचार करता अखेर महाराष्ट्र राज्य (State) मंगल कार्यालय व लॉन्स फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे. फेडरेशनच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मंगल कार्यालय व लॉन्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी नाशिक (Nashik) मंगल कार्यालय संघटनेचे कार्याध्यक्ष व वेडिंग इंडस्ट्रीज ऑफ नाशिकचे अध्यक्ष संदीप काकड यांची, तर सेक्रेटरीपदी समाधान जेजुरकर यांची नियुक्ती करण्यात आली. या फेडरेशनची स्थापना करण्यासाठी नाशिकमध्ये राज्यभरातील विविध भागांमधील प्रतिनिधी आले होते. यावेळी मंगल कार्यालय आणि लॉन्स व्यवसायासमोर येणाऱ्या काळात कोणत्या समस्या आणि आव्हाने आहेत, यावर चर्चा करण्यात आली.
सरकारला घालणार साकडे
नाशिकमध्ये जेजूरकर लॉन्स फेडरेशनची बैठक झाली. यावेळी फेडरेशनच्या स्थापनेबरोबरच मंगल कार्यालय व लॉन्स चालकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या विविध मागण्यांवरही चर्चा करण्यात येऊन या मागण्या व समस्यांबाबत शासन पातळीवर फेडरेशनच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. येणाऱ्या काळात फेडरेशनचे शिष्टमंडळ राज्य सरकारचे संबंधित खात्याचे मंत्र्यांना हे प्रश्न सोडवण्यासाठी साकडे घालणार आहे.
सर्व जिल्ह्यांना स्थान
फेडरेशनच्या राज्य कार्यकारिणीत सर्व जिल्हयांतील पदाधिकार्यांना स्थान देताना मोठ्या महापालिका क्षेत्रातून 3 तर लहान जिल्हयामधून 2 पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. यात एक अध्यक्ष, प्रत्येक विभागातून एक याप्रमाणे 6 उपाध्यक्ष तसेच 1 सेक्रेटरी, सहसेक्रेटरी, खजिनदार याप्रमाणे 10 पदाधिकार्यांची कोअर कमिटी तयार करण्यात आली. पदाधिकार्यांनी आपापल्या विभागांमध्ये सर्व मंगल कार्यालय धारकांना फेडरेशनचे सभासद करून घेण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले.
अशी आहे कार्यकारिणी
महाराष्ट्र राज्य मंगल कार्यालय व लॉन्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी नाशिकचे संदीप काकड यांची तर सेक्रेटरीपदी समाधान जेजूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी धुळे येथील संजय बोरसे, अकोला येथील दर्शन गोयंका, बुलढाणा येथील राजेंद्र कायस्थ, औरंगाबाद येथील अरुण वाकडे, नंदुरबार येथील संदीप चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!