AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नैसर्गिक नाले बुजवल्यावरुन मनसेचे माजी आमदार आक्रमक, नाशिक महापालिकेत धरणे आंदोलन

शहरातील पावसाच्या काळात वाहून जाणाऱ्या पाण्याच्या मुद्यावरुन नाशिकमध्ये मनसेचे माजी आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी नाशिक मनपा आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

नैसर्गिक नाले बुजवल्यावरुन मनसेचे माजी आमदार आक्रमक, नाशिक महापालिकेत धरणे आंदोलन
नितीन भोसले यांचं आंदोलन
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 6:02 PM
Share

नाशिक: शहरातील पावसाच्या काळात वाहून जाणाऱ्या पाण्याच्या मुद्यावरुन नाशिकमध्ये मनसेचे माजी आमदार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी नाशिक मनपा आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नाशिक महापालिकेने प्रश्न सोडवले नाहीत, तर पुढील काळात तीव्र आंदोलन करु, असा इशारा नितीन भोसले यांनी दिला. (Nashik ex MLA MNS leader Nitin Bhosale protest at Nahsik Municipal Corporation Commissioner office for rain water during rain)

पावसाचं पाणी वाहून जाणारे नाले बुजवाल्याच्या निषेधार्थ आंदोलन

नाशिक शहरातील कर्मयोगी नगर भागात अनेक पावसाळी पाणी वाहून जाणारे नैसर्गिक नाले बुजवाल्याच्या निषेधार्थ मनसे नेते नितीन भोसले यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं आहे. नैसर्गिक नाले बुजवल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने माजी आमदार नितीन भोसले आक्रमक झाले होते. महापालिका अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या संगनमताने नाले बुजवल्याचा आरोप नितीन भोसले यांनी आरोप केला आहे. नितीन भोसले यांनी बुजवलेल्या नाल्याचा प्रश्न त्वरित मार्गी न लावल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोरोनामुळे स्मार्ट सिटीला प्रकल्पाला मुदतवाढ

सीताराम कुंटे यांनी नाशिक स्मार्ट सिटी प्रकल्पाला मुदतवाढ 2 वर्ष मिळणार असल्याची माहिती यावेळी दिली. कोविड मुळे हा कालावधी वाढवून देण्यात येत आहे. शहराच्या विकासासाठी पालिका प्रशासन, पदाधिकारी यासोबत समन्वय आवश्यक आहे, असं सीताराम कुंटे म्हणाले. ग्रीन फिल्ड प्रस्ताव नगरविकास विभागाकडे, मात्र हा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. ABD प्रोजेक्ट मध्ये शहरात अतिरिक्त रस्ते निर्मिती केली जाते. कोरोना मुळं स्मार्ट सिटी कामातील गती कमी झाली. या प्रकल्पात आता विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी समन्वयक असतील.

स्मार्ट सिटीचा कारभार सुमंत मोरे यांच्याकडं

नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल आणि लोक प्रतिनिधी यांच्यामध्ये संघर्ष होत होता. त्यामुळे नाशिकच्या नगरसेवकांनी प्रकाश थविल यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. राज्याचे सचिव सीतारम कुंटे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत प्रकाश थविल यांची बदली करण्यात आली आहे. आता सुमंत मोरे नाशिक स्मार्ट सिटीचे नवीन सीईओ असतील. थविल यांची बदली प्रशासकीय बाब असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी नगरसेवकांच्या रेट्या पुढे स्मार्ट सिटी प्रशासन झुकलं असल्याची चर्चा आहे.

इतर बातम्या:

ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात, छगन भुजबळ यांचं वक्तव्य

तिसरी लाट तिशीच्या आतील तरुणांसाठी धोकादायक; टास्क फोर्सच्या हवाल्याने अजित पवारांचा इशारा

(Nashik ex MLA MNS leader Nitin Bhosale protest at Nahsik Municipal Corporation Commissioner office for rain water during rain)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.