संजय राऊतांनी संभाळून राहावं; शिंदे सरकारमधील मंत्र्याचा थेट इशारा

Girish Mahajan on Sanjay Raut : मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसंच संजय राऊतांनी संभाळून राहावं, असं म्हणत त्यांनी इशाराही दिला आहे. तसंच अमित शाह यांच्या दौऱ्याबाबतही महाजनांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

संजय राऊतांनी संभाळून राहावं; शिंदे सरकारमधील मंत्र्याचा थेट इशारा
संजय राऊत, खासदारImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 12:11 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अमित शाह भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. जेव्हा- जेव्हा अमित शाह महाराष्ट्रात येतात. तेव्हा इथले उद्योग गुजरातला जातात. त्यामुळे नाशिककरांनी सतर्क राहावं, असं राऊत म्हणाले. त्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी सांभाळून राहावं, असं महाजन म्हणालेत.

राऊतांवर निशाणा

संजय राऊत यांनी जमीन घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यावरही महाजरांनी भाष्य केलं. तक्रार दाखल करायाला सांगा. काय घोटाळा आहे त्याची चौकशी करावी. संजय राऊतांनी हवेत गोळीबार करू नये. मला त्या भुखंडाबद्दल माहिती नाही. असा कोणता विषय आमच्यासमोर आला नाही.  संजय राऊतांना लोक गांभिर्यांने घेत नाहीत. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करण्याचं संजय राऊतांचे स्वप्न आहे. अमित शाह आले त्यामुळे संजय राऊतांना त्यांना थरकाप भरला आहे. हास्यास्पद बोलत असतात. असं कोणी कोणत्या अधिका-याला दम देतं का? संजय राऊतांनी संभाळून राहावं, असं गिरीश महाजनांनी म्हटलं.

अनेक चांगले निर्णय बैठकीत झाले. कुठेही वादावादी झाली नाही. बाकी सगळ्या कपोलकल्पीत बातम्या आहेत. जागावाटपासंदर्भात सर्वेचा आधार घेतला जाईल. कार्यकर्त्यांचा मतं विचारत घेतली जातील. खडसे आज कुठे आहेत हे त्यांनाच विचारा. देवेंद्र फडणवीस सांगतील गणपती झाले आता देवी येतील. आता मी नार्को टेस्टची वाट पाहत आहेत. खडसे मोठे नेते आहेत, ते दिल्लीतील नेत्यांशी बोलतात. मी फोटोची वाट पाहत आहेत, असं महाजरांनी म्हटलं आहे. थोड्या फार फरकाने जागावटपाचा तिढा असतो. अनेकांच्या जागवाटपात मागण्या असू शकतात. परंतु अमित शाह, जे पी नड्डा यांच्या बैठकीत जागा वाटप पूर्ण होईल, असं म्हणत महाजनांनी जागावाटपावर भाष्य केलं.

अक्षय शिंदे एन्काऊंटरवर काय म्हणाले?

विरोधी पक्षातील लोकांची मागणी होती तात्काळ फाशी द्या. आज मात्र इन्काऊंटर झाल्यावर विरोधक असं तोंड करत आहेत. जसा काही घरचा माणूस गेला आहे. बरं झालं विरोधक त्याच्या आईला भेटायला गेले नाहीत. मोठ्याने रडा, फडणवीसांचा राजीनामा मागा म्हणून सांगायले गेले नाहीत, असं म्हणत महाजनांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरून विरोधकांवर टीका केलीय.

भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?
भाऊ की भाई? शिंदे-फडणवीस समर्थकांमध्ये एन्काऊंटरच्या श्रेयावरुन वॉर?.
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं
अक्षय शिंदेचं एन्काऊंटर पोलिसांच्या व्हॅनमध्येच... पण त्याआधी काय घडलं.
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग
आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राऊतांसह राजकीय नेत्यांची फायरिंग.
म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान
म्हणून लाडक्या बहिणीचा जुगाड, योजनेवरून भाजप आमदाराचं धक्कादायक विधान.
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'.
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या.
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?.
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर.