Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नासाका’चे बॉयलर पेटणार, खासदार पुत्र गोडसेंकडे सारथ्य जायची शक्यता

गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तंगीमुळे बंद पडलेल्या नाशिक (Nashik) सहकारी साखर कारखान्याचे (NASAKA) बॉयलर यंदा पेटणार आहे. हा कारखाना खासदार हेमंद गोडसे (MP Hemant Godse) यांच्या पुत्राकडे चालवायला येण्याची शक्यता आहे.

'नासाका'चे बॉयलर पेटणार, खासदार पुत्र गोडसेंकडे सारथ्य जायची शक्यता
नाशिक (Nashik) सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर यंदा पेटणार आहे.
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 4:25 PM

नाशिकः गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक तंगीमुळे बंद पडलेल्या नाशिक (Nashik) सहकारी साखर कारखान्याचे (NASAKA) बॉयलर यंदा पेटणार आहे. हा कारखाना खासदार हेमंद गोडसे (MP Hemant Godse) यांच्या पुत्राकडे चालवायला येण्याची शक्यता आहे. (Nashik Government Sugar Factory to be started, MP Hemant Godse’s son Ashtalakshmi Infrastructure Company submitted tender)

नाशिक सहकारी साखर कारखान्याची तब्बल 1200 मेट्रीक टन गाळप क्षमता आहे. या कारखान्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जवळपास 17 हजार सभासद आहेत. हा कारखाना बंद असल्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत. तसेच, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन हा साखर कारखाना सुरू करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. खासदार हेमंत गोडसे यांच्या मुलाच्या अष्टलक्ष्मी इन्फ्रास्टक्चर कंपनीने ‘नासाका’ चालविण्यास तयारी दर्शवली आहे. तशी निविदाही त्यांनी दाखल केली आहे. आता ही निविदा शासनाकडे पाठवण्यात आली आहे. सहकार विभागाने या निविदेला हिरवा कंदील दिला, तर हजारो जणांना रोजगार मिळणार असून, शेतकऱ्यांच्या उसाचा प्रश्नही मिटणार आहे.

यापूर्वीही झाले प्रयत्न

कारखाना चालविण्यास घेण्यासाठी यापूर्वी बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे व आमदार सरोज आहिरे यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांची सहकारमंत्र्यांसह साखर आयुक्तांसमवेत बैठकही झाली होती. त्यानंतर ९ जुलै २०२१ रोजी बाजार समिती व ‘नासाका’चे सभासद यांच्यासोबत ऑनलाइन सभा घेऊन चर्चा करण्यात आली. दोन ठराव केले गेले. एक प्रस्ताव प्रस्ताव सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधकांना पाठवला. त्यांनी पणन संचालकांकडे व संचालकांनी शासनाकडे पाठवला. मात्र, शासनाने बाजार समितीला हा कारखाना चालवायला परवानगी दिली नाही.

काढला होता विक्रीस

नाशिक सहकारी साखर कारखाना काही दिवसांपूर्वी विक्रीस काढण्यात आला होता. त्यासाटी नाशिक जिल्हा बँकेने पुढाकार घेतला होता. बँकेने कारखान्याचे सुमारे १३७ कोटी रुपयांचे मूल्य काढले होते. त्यानंतर साखर आयुक्तांकडे ‘नासाका’ विक्रीची परवानगी मागितली होती. मात्र, माजी खासदार देविदास पिंगळे आणि आमदार सरोज अहिरे यांनी पणन व सहकारमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. सोबतच शासनाकडेही जोर लावला. या प्रयत्नांमुळेच या कारखान्याची विक्री होता होता राहिली आहे. (Nashik Government Sugar Factory to be started, MP Hemant Godse’s son Ashtalakshmi Infrastructure Company submitted tender)

इतर बातम्याः

नाशिकमधल्या 24 धरणात 78 टक्के पाणीसाठा; धरणांवर गेल्यास फौजदारी

महावितरणला केवळ एक रुपयाच्या मोबदल्यात दिली दीड एकर जमीन, हजारोंच्या घरात प्रकाश

ओ मेरे सोना रे सोना रे सोना…नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने 46900 वर!

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.