Nashik Rain Update : नाशिकच्या इगतपुरीमध्ये पावसाची जोरदार ‘बरसात’, 24 तासात 132 मिमी पावसाची नोंद

Nashik Rain Update : इगतपुरी तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पड़त आहे. 6 दिवसांत एकूण 721 मिमी तर गेल्या 24 तासांत 132 मिमी पाऊस पडला आहे.

Nashik Rain Update : नाशिकच्या इगतपुरीमध्ये पावसाची जोरदार 'बरसात', 24 तासात 132 मिमी पावसाची नोंद
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 1:33 PM

इगतपुरी, नाशिक : सुरुवातीला जून महीना कोरडा गेल्यानंतर जवळपास महिनाभरापासून पावसाची (Nashik Rain Update) अक्षरशः चातकाप्रमाणे वाट बघणा-या बळीराजाला आपला खरीप हंगाम वाया जातो की काय अशी भीती सुरुवातीला वाटत होती. मात्र 6 दिवसांपासून इगतपुरी तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. यावर्षी महीनाभराची तूट 6 दिवसांत पावसाने भरुन काढली आहे. 6 दिवसांत एकूण 721 मिमी तर गेल्या 24 तासांत 132 मिमी पाऊस पडला आहे. तालुक्यातील सहा मंडल विभागात सर्वत्र जलमय स्थिती असून सार्वजनिक मालमत्तेचे देखील मोठे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी रस्ते, मो-या वाहून गेल्याने संपर्क तुटलेले आहे. इगतपुरी तालुक्यात आजपर्यंत एकूण सुमारे 1266 मिमी पाऊस झाला. गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी जास्त पाऊस बरसत आहे. या पावसाने ब्रिटिशकालीन दारणा धरण 68 टक्के भरले असुन भावली धरणात ही दारणाच्या बरोबरिने पाण्याची आवक वाढत आहे. भावलीत (Bhavali Dam) 65 टक्के पाणी आले होते.

गेल्या 6 दिवसांपासून सुरु असलेली संत्ततधारेमुळे बळीराजा सुखावला आहे. वाया जाणारा खरीप हंगाम पांडुरंगच्या कृपेने तरला असुन सर्वत्र भात लागवडी वेगात सुरु झाल्या आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कालपासून दिवसभर पावसाने मुसळधार रुप धारण केले होते. आज सकाळी 6 पर्यंत गेल्या 24 तासात इगतपूरी येथे 132 मिमी पावसाची नोंद झाली आहे आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. तालुक्यातील इगतपुरी,घोटी, वैतरणा (धारगाव), खेड, टाकेद,वाडीव-हे,नांदगाव बु मंडळ विभागात आज मुसळधार पाऊस होत आहे. सह्यद्रिच्या घाटमाथा परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे रखडलेल्या भाताच्या लावण्या जोरात सुरु आहेत. पावसामुळे बळीराजा सुखावला असुन सर्वत्र समाधान व्यक्त होतेय.

हे सुद्धा वाचा

धरणातील जलसाठा आणि पाऊस आकडेवारी

  1. दारणा : 67.21 टक्के
  2. मुकणे : 50.56
  3. वाकी : 9.87
  4. भाम : 46.06
  5. भावली : 64.92
  6. कडवा : 68.90

आजचा पाऊस : 132 मिमी

एकूण पाऊस : 1266 मिमी

दारणातून विसर्ग : 4113 क्यूसेस

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.