Nashik | मुख्याध्यापक आहेत की हैवान; 7 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, दहावीचे वर्ष बर्बाद करण्याची धमकी

नाशिक येथील शाळेतील मारहाणप्रकरणी एका विद्यार्थ्याने पोलिसात धाव घेतली आहे. मात्र, दुसऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलाचे वर्ष वाया जाईल म्हणून तक्रार देण्यासाठी घाबरत आहेत. या मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Nashik | मुख्याध्यापक आहेत की हैवान; 7 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, दहावीचे वर्ष बर्बाद करण्याची धमकी
नाशिकमधील शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 11:27 AM

नाशिकः दहावीच्या जवळपास सहा ते सात विद्यार्थ्यांना (students) बेदम मारहाण करण्याचा प्रताप नाशिक (Nashik) येथील जेलरोड भागातल्या शाळेत एका मुख्याध्यापकांनी (headmaster) केल्याचे समोर आले आहे. स्कॉटीश अकॅडमी शाळेत हा प्रकार घडला. मात्र, अनेक पालक भीतीमुळे पुढे येऊन तक्रार करायला तयार नाहीत. त्यातील यशराज अनिल ढिकले या विद्यार्थ्याने आपल्याला केलेल्या अमानुष मारहाणीची आपबीती माध्यमांना सांगितली. त्याच्या पाठीवर, दंडावर उमटलेले वळही त्यांने दाखवले. तेव्हा हे मुख्याध्यापक आहेत की हैवान, असाच प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होईल, अशी अवस्था या विद्यार्थ्याची करून सोडलेले निदर्शनास आले. हे पाहत पालक म्हणून तुम्हीही दक्ष रहा. असे कोणत्याही शाळेत घडू शकते. नेमकी काय घटना ते जाणून घेऊयात.

नेमके प्रकरण काय?

नाशिकमधील जेलरोड भागात स्कॉटीश अकॅडमी शाळा आहे. या शाळेचा परिसरात मोठा नावलौकीक आहे. अनेक पालक आपल्या विद्यार्थ्याला येथे प्रवेश मिळावा म्हणून धडपडतात. मात्र, येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना चक्क गुराढोरासारखी अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे एक साधी काच फुटली म्हणून मुख्याध्यापकाने शाळेतील जवळपास सहा ते सात विद्यार्थ्यांना मारले. त्यामुळे त्यांच्या दंडावर, छातीवर वळ उठले. यशराज ढिकले या विद्यार्थ्याची पाठ या मारहाणीमुळे सोलून निघाली होती.

पाच हजारांची मागणी

इतक्या मारहाणीनंतर मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्याकंडे चक्क पाच हजार रुपयांची मागणीही केलीय. या प्रकरणी कुठे तक्रार कराल, पोलिसात जाल, तर तुमचे दहावीचे वर्ष बर्बाद करू, अशी धमकीही या महाशयांनी या विद्यार्थ्यांना दिली. यातल्या एका विद्यार्थ्याने पोलिसात धाव घेतली आहे. मात्र, दुसऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलाचे वर्ष वाया जाईल म्हणून तक्रार देण्यासाठी घाबरत आहेत. या मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

पालकांमध्ये भीती

शाळेतील मारहाणीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांना अशी गंभीर मारहाण होत असेल, तर शाळेत पाठवायचे कसे, असा सवाल ते करत आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी या साऱ्या डोळ्यादेखत घडलेल्या मारहाणीची चांगलीच धास्ती घेतली आहे.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.