मालेगावमध्ये सभा का घेतोय…? ; संजय राऊत यांनी कारण सांगितले..

उत्तर महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांचे प्रश्न गंभीर आहेत, कांद्याला भाव मिळत नाहीत. येथील कांदा रस्त्यावर फेकला जातो आहे, पण आपल्याला बाजूच्या सुहास कांद्याला रस्त्यावर फेकायचे आहे.

मालेगावमध्ये सभा का घेतोय...? ; संजय राऊत यांनी कारण सांगितले..
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 8:06 PM

मालेगाव/नाशिक : कोण आला रे कोण, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देत उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करताना ही शिवसेना कुठेही वाकलेली नाही, झुकेलेली नाही अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाचा समाचार घेतला. यावळी खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत राज्याचे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, हे तुफान आता कोणी रोखू शकत नाही शिवसेना हे काय आहे ते पाहायचं असेल तर त्या निवडणूक आयोगाने मालेगावमध्ये एकदा इकडे येऊन पाहावं असा टोला त्यांनी निवडणूक आयोगाला लगावला आहे.

निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली नाही तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाचं महाकाव्य निर्माण करून ठेवले आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

संजय राऊत यांनी सांगितले की,  मोर बसेलेले हे प्रामाणिक आणि निष्ठावंत शिवसैनिक आहेत. ही शिवसेना विधानसभेत पुन्हा भगवा फडकवेल आणि उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सभेतही त्यांनी सांगितले की, ही शिवसेना तुटलेली नाही, वाकलेली नसून सर्व धर्माचे नागरिक शिवेसेनेच्या पाठीशी उभी आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

खासदार संजय राऊत यांनी येथील आमदारांवर टीका करताना मालेगावमध्ये सभा का घेत आहोत तर मालेगावचा ढेकून चिरडण्यासाठी ही सभा घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्यासारखा आपल्यासारखा प्रमाणिक नेता आम्हाला मिळाला आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या प्रामाणिकपणावर संदेह केला जाऊ शकत नाही असंही त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.

उत्तर महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांचे प्रश्न गंभीर आहेत, कांद्याला भाव मिळत नाहीत. येथील कांदा रस्त्यावर फेकला जातो आहे, पण आपल्याला बाजूच्या सुहास कांद्याला रस्त्यावर फेकायचे आहे.

गुलाबराव पाटलांना रस्त्यावर फेकायचा आहे, ज्यांनी गद्दारी केली त्या प्रत्येकाला त्याच खोक्याखाली चिरडायचं आहे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.