AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ गो बॅक!; छगन भुजबळ यांचा ताफा जाताच मराठा आंदोलकांनी गोमुत्र शिंपडलं

Maratha Andolak Oppose To NCP Leader Chhagan Bhujbal : नाशकात हालचाली वाढल्या आहेत. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा जात असलेल्या रस्त्यावर मराठा आंदोलकांनी गोमुत्र शिंपडलं आहे. मराठा आंदोलकांनी यावेळी भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे.

छगन भुजबळ गो बॅक!; छगन भुजबळ यांचा ताफा जाताच मराठा आंदोलकांनी गोमुत्र शिंपडलं
| Updated on: Nov 30, 2023 | 12:29 PM
Share

उमेश पारिक, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, नाशिक | 30 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे आज नाशिकमध्ये आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाची ते पाहणी करत आहेत. त्यांच्या या दौऱ्याला नाशिकमधील मराठा समाजाने कडाडून विरोध केला आहे. आज सकाळपासूनच नाशिकच्या येवल्यात मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांचा निषेध केला जात आहे. मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत गोमूत्र शिंपडलं आहे. येवल्याच्या सोमठानदेश गावातील ज्या मार्गावरून छगन भुजबळ गेले त्या मार्गावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं आहे.

मराठा समाजाचा तीव्र विरोध

अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पिकांचं नुकसान झालं आहे. अशात मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. या पहाणी दरम्यान छगन भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं आहे. मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी आंदोलन करत भुजबळांचा निषेध नोंदवला आहे.

छगन भुजबळ यांचा हा पाहणी दौरा संपल्यानंतर ज्या रस्त्यावरून छगन भुजबळ परतले. त्या रस्त्यावर मराठा आंदोलकांनी गोमूत्र शिंपडलं आहे. सोमठानदेश इथं पाहणी दौरा आटोपून मंत्री भुजबळ परतले. तेव्हा त्या रस्त्यावर गोमुत्र शिंपडण्यात आलं. दौरा आटोपून भुजबळ परतीच्या प्रवासाला निघालेले असतांना आंदोलकांनी पुन्हा घोषणाबाजी केली. अर्धनग्न होत आंदोलकांनी काळे शर्ट फिरवत भुजबळांचा निषेध केला. यावेळी छगन भुजबळ गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या.

लासलगावातील कोटमगाव रेल्वे पुलाजवळ मराठा समाज आक्रमक झाला आहे. ‘छगन भुजबळ गो बॅक’ च्या पाट्या हातात घेवून मराठा आंदोलक घोषणाबाजी करत आहेत. लासलगाव जवळील कोटमगाव इथं नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्याआधीच भुजबळांना विरोध करण्यात येत आहे. ‘भुजबळ गो बॅक’ चे पोस्टर रेल्वे पुलाच्या भिंतीला चिकटवले आहेत. रस्त्याचं आणि पाण्याचं काम होत नसल्याने लासलगावमधील ग्रामस्थ संतप्त झालेत. आश्वासनं नकोत तर कामं करा…, असं म्हणत या ग्रामस्थांनी ताफा थांबवून छगन भुजबळांना निवेदन दिलं आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.