नाशिक महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं, महाजनांनी सांगितला पुन्हा पालिका जिंकण्याचा प्लॅन

नाशिक महापालिकेचा गड राखण्याची जबाबदारी भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahjan) यांना देण्यात आली आहे. आज गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये दाखल होत. आगामी निवडणुकीत भाजपचा प्लॅन काय असेल याबाबत कार्यकर्यांना मार्गदर्शन केले आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं, महाजनांनी सांगितला पुन्हा पालिका जिंकण्याचा प्लॅन
गिरीश महाजन नाशिकचे प्रभारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 5:27 PM

नाशिक : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे जोरदार वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहे. भाजपने (Bjp) तर निवडणुकांचे प्रभारीही जाहीर केले आहे. नाशिक महापालिकेचा गड राखण्याची जबाबदारी भाजपकडून गिरीश महाजन (Girish Mahjan) यांना देण्यात आली आहे. आज गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये दाखल होत. आगामी निवडणुकीत भाजपचा प्लॅन काय असेल याबाबत कार्यकर्यांना मार्गदर्शन केले आहे. महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजलेय. मेपर्यंत राज्यातील महापालिका निवडणुका होतील, असे वक्तव्य महाजन यांनी केली आहे. तर पाच वर्षात केलेली कामं पाहून जनता भाजपला पु्न्हा निवडूण देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले आहे.

नाशिकमध्ये लढत रंगत होणार

फक्त महाजनच नाही तर इतरही भाजपचे नेते नाशिकमध्ये जोर लावत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही नाशिकचे अनेक दौरे केले आहेत. तर राज ठाकरे अनेकदा नाशिकमध्ये ठाण मांडून बसले आहेत. मनसे गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी धडपडत आहे. नाशिकमध्ये मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चाही रंगत आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर शिवसेनेकडून संजय राऊत यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे ही लढत रंगत होणार आहे.तर राष्ट्रवादीकडून पालकमंत्री छगन भुजबळ भाजपवर तोफा डागत आहेत. फक्त नाशिकच नाही तर मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा राज्यातल्या मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नेते आता जोमाने मैदानात उतरले आहेत.

समीर भुजबळ काय म्हणाले?

नाशिक शहर व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी विविध विकासाची कामे आपण केलेली आहे. ही विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा कारण ज्यांनी नाशिकला दत्तक घेण्याची भाषा केली. त्यांनी नाशिकसाठी कुठली विकासाची कामे केली हा प्रश्नच असून नाशिककरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. याविषयीची सत्यता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घरातघरात जाऊन जनजागृती करावी असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.

मेट्रो कारशेडची नवी जागा लवकरच घोषित करू, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, वाद संपणार?

VIDEO: राणे पिता पुत्रांची मुंबईत पोलीस ठाण्यात हजेरी, फडणवीस न बोलता का निघून गेले?

‘यशवंत जाधवांनी छगन भुजबळांनाही मागे टाकलं, 100 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग!’, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.