नाशिक पालिकेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, 7109 ऑक्सिजन बेड ठेवले सज्ज

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भयकारी आठवणींनी अजूनही नाशिककरांच्या (Nashik) काळजाचा ठोका चुकतो. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महापालिका (Municipal Corporation) आतापासून कंबर कसून कामाला लागली आहे.

नाशिक पालिकेला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती, 7109 ऑक्सिजन बेड ठेवले सज्ज
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 12:55 PM

नाशिकः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भयकारी आठवणींनी अजूनही नाशिककरांच्या (Nashik) काळजाचा ठोका चुकतो. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महापालिका (Municipal Corporation) आतापासून कंबर कसून कामाला लागली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी (corona wave) म्हणून 12518 बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यात 7109 ऑक्सिजन बेड्स, तर 679 व्हेटिंलेटर्स आहेत. शहरातील महापालिकेची सर्व रुग्णालये व खासगी रुग्णायलाय ही व्यवस्था करण्यात आली आहे. (Nashik Municipal Corporation fears third wave of corona, 7109 oxygen beds ready)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी रुग्णालयांचे उंबरे झिजवण्याची वेळ आली. मात्र, ऑक्सिजन मिळत नव्हता. हे पाहता आता रोज 100 मेट्रिक टन मागणीच्या चौपट ऑक्सिजन साठा तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता सज्ज ठेवला जाणार आहे. ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी 22 प्लांट उभारण्यात आले आहेत.

रोज 240 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज

तिसरी लाट आली तर ती भीषण असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही भीती लक्षात घेऊन महापालिकेने शक्य तितकी जास्त तयारी सुरू केली आहे. या लाटेत दररोज 240 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागू शकते. हो पाहता सध्या रोज 251 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा उपलब्ध करण्यात येत आहे.

लहान मुलांची विशेष सोय

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरे तर या भीतीला कसलाही वैज्ञानिक आधार नाही. मात्र, तरीही महापालिकेने नाशिकरोड येथील नूतन बिटको रुग्णालयात 100 बेड्सच्या कोविड कक्षाची उभारणी केली आहे. येथे नवजात बालकांसाठी पाच व्हेंटिलर तयार ठेवण्यात आले आहेत. सोबत इतर खासगी रुग्णालयाती सोय करण्यात आली असून, तिथे तीनशे बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी बालरोग तज्ज्ञांची टीमही दिमतीला असणार आहे.

नियमांचे पालन नाही

नाशिकमध्ये सध्या रोज कमी कोरोना रुग्ण निघत असले तरी अजूनही तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्या पार्श्वभूमीवर नागरिक बिनधास्त फिरताना दिसत आहेत. शहरातील पंचवटी, द्वारका, मुंबईनाका, कॉलेजरोड, गंगापूररोड, अशोकामार्ग, मुख्य बसस्थानक परिसर या भागातही बहुतांश जण नियमांचे पालन करत नाहीत. मास्क हल्ली क्वचितजणच वापरतात. अनेक ठिकाणी गर्दी होते. शहरात विविध आंदोलनेही सुरू असतात. हे पाहता तिसरी लाट आल्यास तिला आवरणे नक्कीच कठीण होणार आहे. (Nashik Municipal Corporation fears third wave of corona, 7109 oxygen beds ready)

इतर बातम्याः 

हिरव्यागच्च झाडाचा बहर गळून पडला, सुलोचना महानोर यांचे निधन

Nashik Weather: नाशिकमध्ये दोन दिवस मोठा पाऊस नाही, पावसाळा लांबण्याची शक्यता

नाशिकमध्ये ई बाइकला मागणी, सीएनजी कारला वर्षाची वेटिंग

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.