नाशिकमध्ये होम आयसोलेशन रद्द होणार? पालिका आयुक्तांचे संकेत; म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

नाशिक जिल्यातील कोरोना रुग्णांचे होम आयसोलेशन रद्द करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांमध्ये घेण्यात येऊ शकतो. Nashik Municipal Corporation home isolation

नाशिकमध्ये होम आयसोलेशन रद्द होणार? पालिका आयुक्तांचे संकेत; म्युकरमायकोसिसचा धोका वाढला
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 11:49 AM

नाशिक: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकताच 18  जिल्ह्यांमधील होम आयसोलेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता नाशिक महापालिका देखील तसाच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांना कोव्हिडं सेंटर मध्ये हलवणार असल्याचे संकेत महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका देखील वाढला आहे. (Nashik Municipal Corporation likely to cancel home isolation in city)

होम आयसोलेशन रद्दचा निर्णय कधी?

महापालिकेनं होम आयसोलेशन रद्द करण्याबद्दल तयारी सुरू केली आहे. नाशिक रेड झोन मध्ये आल्यास होम आयसोलेशन बंद होणार आहे. घरगुती उपचार घेणाऱ्या रुगणांची पालिकेकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत नाशिकमध्ये 2435 रुग्णांणवर घरीच उपचार सुरू आहेत.

नाशिकमध्ये जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला

नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीचा काळात म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसने 19 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत म्युकरमायकोसिसचे 325 च्या वर रुग्ण आहेत. तर यापैकी 185 रुग्णांणवर शस्त्रक्रिया सुरू आहेत. शहरांपेक्षा ग्रामीण भागात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आता शहरातील उद्योग अडचणीत

नाशिकमधील उद्याोगांना 30 टक्के उद्योगांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. उद्योग चालवण्यास परवानगी, मात्र ऑक्सिजन पुरवठा होत नाही अशी परिस्थिती आहे. जिल्हा प्रशासनाकडून या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. वैद्यकीय वापरासाठी दिलेल्या 2000 सिलेंडर परत मिळण्याची प्रतीक्षा उद्योगांना आहे.

नाशिक कोरोना अपडेट 27 मे 2021

बरे झालेले रुग्ण- 1117

पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 728

नाशिक मनपा- 325 नाशिक ग्रामीण- 397 मालेगाव मनपा- 06 जिल्हा बाह्य- 00

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4550

दिवसभरातील एकूण मृत्यू -36 नाशिक मनपा- 20 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 16 जिल्हा बाह्य- 00

संबंधित बातम्या:

नाशिकमध्ये लहान मुलांना कोरोनाचा विळखा, मनपा लस खरेदी करण्याच्या तयारीत

नाशिक दुर्घटनेची जबाबदारी भाजपनं घ्यावी, महापौर आणि भाजपचे 3 आमदार फरार झाले काय? काँग्रेसचा सवाल

(Nashik Municipal Corporation likely to cancel home isolation in city)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.