तांदूळ घोटाळ्याच्या चौकशीत नाशिकमध्ये टोलवाटोलवी; महापालिकेने मारली झेडपीच्या गळ्यात जबाबदारी

नाशिकमधील या 13 कंत्राटदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई मागे घेण्यासाठी काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी जोर लावला होता. सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेतली आणि...

तांदूळ घोटाळ्याच्या चौकशीत नाशिकमध्ये टोलवाटोलवी; महापालिकेने मारली झेडपीच्या गळ्यात जबाबदारी
नाशिकमध्ये गोदामात दडवून ठेवलेला तांदळाचा साठा.
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 12:58 PM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) शालेय पोषण आहारातील तब्बल 15 हजार किलो तांदळावर एका कंत्राटदाराने डल्ला मारल्याचे नुकतेच समोर आले. मात्र, आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी टोलवाटोलवी सुरू आहे. आम्ही फक्त तांदळाची मागणी करणार, अशी अजब भूमिका घेत महापालिकेने (municipal corporation) ही चौकशी जिल्हा परिषदेच्या गळ्यात मारली आहे. जिल्हा परिषदेचचा शिक्षण (Education) आणि विशेषतः शिक्षणाधिकारी हे या चौकशी समितीचे सर्वेसर्वा असल्याचे सांगत हात झटकण्यात आले आहेत. पालिकेच्या या संशयास्पद भूमिकेमुळे जिल्हा परिषद तरी हे प्रकरण शेवटपर्यंत लावून धरणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नेमके प्रकरण काय?

नाशिकमध्ये तांदूळ घोटाळ्याच्या अनेक सुरस कथा आहेत. अडीच वर्षांपूर्वी शासनाच्या आदेशाचा आधार घेत बचत गटांना बाजूला सारून 13 कंत्राटदारांना सेंट्रल किचन अंतर्गत मुलांना पोषण आहार देण्याचे काम दिले गेले होते. तेच काम पंचवटीतील गुंजाळबाबा नगर येथे निफाड येथील स्वामी विवेकानंद संस्थेच्या कंत्राटदाराकडे देण्यात आले. कंत्राटदार हृषीकेश चौधरी याने याचाच लाभ घेत तब्बल 281 पोते तांदूळ म्हणजे 15 हजार किलोच्या धान्यावर डल्ला मारला होता. याची माहिती महिला बचत गटाला समजली. त्यांनी तपासणीसाठी आलेल्या प्राथमिक शिक्षण संचालयाच्या पथकाला माहिती देऊनही त्यावर कारवाई झाली नाही. मात्र, त्यानंतर महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी या ठिकाणी धडक दिली. पंचनामा केला. मात्र, आता या प्रकरणावर कारवाई आणि चौकशी करायला महापालिका टाळाटाळ करत आहे.

बड्या नेत्यांचे हात

खरे तर नाशिकमधील या 13 कंत्राटदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई मागे घेण्यासाठी काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी जोर लावला होता. सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक घेतली. विशेष म्हणजे या कंत्राटदाराचे 2 कोटी 70 लाखांचे बिल काढण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षण संचालयाचे पथक तपासणीसाठी आले होते. त्यांच्यापुढेच कंत्राटदार पोषण आहाराच्या तांदळावर कसा डल्ला मारतोय, ही पोती गोदामात कशी पडून आहेत, हे महिला बचत गटाने दाखवून दिले. मात्र, या पथकाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. या प्रकरणातील कंत्राटदारावर बड्या नेत्यांचा वरदहस्त आहे. हे पाहता चौकशीची टोलवाटोलवी सुरू असल्याचे समजते.

इतर बातम्याः

Birth Anniversary | पोरकी लेक, प्रसिद्ध अभिनेत्री, 5 वेळा मुख्यमंत्री; जयललितांचा रोमहर्षक प्रवास…!

महापालिकेत घराणेशाहीचा झेंडा; नाशिकमध्ये नेत्यांच्या एका-एका घरातून तिघा-तिघांना हवे तिकीट!

नाशिकमध्ये 7 नगरपरिषदांच्या निवडणुका; प्रभाग रचना 5 एप्रिलला होणार प्रसिद्ध, कसा आहे कार्यक्रम?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.