AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझा मर्डर फिक्स… सुहास कांदेंची भुजबळांना धमकी; नांदगावात मोठा राडा

Nandgoan Suhad Kande and Sameer Bhujbal Rada : तुझा मर्डर फिक्स... असं म्हणत आमदार सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना धमकी दिली आहे. नाशिकच्या नांदगावात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. कांदे आणि भुजबळांचे समर्थक एकमेकांना भिडले आहेत. वाचा सविस्तर...

तुझा मर्डर फिक्स... सुहास कांदेंची भुजबळांना धमकी; नांदगावात मोठा राडा
नाशिकच्या नांदगावमध्ये राडाImage Credit source: tv9
| Updated on: Nov 20, 2024 | 1:34 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यभरात मतदार मतदान केंद्रावर जात मतदान करत आहेत. नाशिकमध्येही मतदान करण्यासाठी मतदार मोठ्या प्रमाणावर मतदार घराबाहेर पडले आहेत. अशातच सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. कांदे आणि भुजबळांचे समर्थक एकमेकांना भिडले आहेत. यावेळी नाशिकच्या नांदगावमध्ये हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. आमदार सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना तुझा मर्डर फिक्स…, असं म्हणत धमकी दिली आहे. नांदगावमधील हा राडा सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे.

नांदगावमध्ये हायहोल्टेज ड्रामा

सुहास कांदे यांनी बोलाविलेल्या मतदारांना समीर भुजबळांनी अडवलं आहे. यावेळी समीर भुजबळ आणि सुहास कांदे समोरासमोर आहे. नांदगाव – मनमाड रस्त्यावरील प्रकार आहे. यावेळी दोन्ही गटात जोरदार राडा पाहायला मिळाला. गुरुकुल कॉलेज परिसरातून मतदार मतदानाला निघाले होते. समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत मतदारांना अडवलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप समीर भुजबळ यांनी केला आहे. तर सुहास कांदे यांनी मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी व्यवस्था केल्याचं सांगितलं आहे.

मी समीर भुजबळांचे नाव घेऊन दिली नाही. हा चुकीचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. मीडियाला विनंती आहे की शहानिशा करावी. एक जण मारहाण करीत होतो. त्याच्या मर्डर होईल असे मी बोललो, असं स्पष्टीकरण सुहास कांदे यांनी दिलं आहे.

सुहास कांदे काय म्हणाले?

नांदगावमध्ये झालेल्या राड्यावर सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही ऊसतोड कामगार राज्यभर कामासाठी साखर कारखान्यावर कामाला जातात. ते मतदानचा अधिकार बजावण्यासाठी आले होते. त्यांच्या मुकादमाने एकत्रित जेवणाची व्यवस्था केली होती.समीर भुजबळ आणि त्यांच्या गुंडांनी त्यांना मार हान करीत जतीवावाचक शिवीगाळ केली. त्यांच्या गाड्याही आडवल्या आणि फोडल्या. ही माहिती मिळताच मी त्या ठिकाणी पोहचलो. त्यावेळी भुजबळांनी त्यांची गाडी आडवी घालून त्यांना रोखलं होतं. त्यांना मतदानापासून रोखले जात होते म्हणून मी त्यांच्या मदतीला धावून गेलो. निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे. हे मतदार नसतील तर त्यांना अटक करा. निवडणूक आयोग शहानिशा केली, असं सुहास कांदे म्हणाले.

आमदार सुहास कांदे यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क बजावला. नांदगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मतदान केलं. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन कांदे यांनी केलं आहे. आम्हीही कर्तव्य बजावले. नांदगावची मायबाप जनता आम्हाला न्याय देईल, असं सुहास कांदे म्हणाले.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.