Nashik : जावईबापूंचा अभिमानास्पद रुसवा, सासरेबुवांना अस्मान ठेंगणे, लग्नाच्या मंडपात फुटली रस्ता दुरुस्तीची सुपारी!
नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या नांदगाव-बोलठाणमध्ये असेच काहीसे घडले. मात्र, ते अतिशय वेगळे होते. समंजस होते. विशेष म्हणजे यातून दुसऱ्यांनी आदर्श घ्यावा असे होते. नवरदेवाची (Navradeva) ही मागणी ऐकुण सासरेबुवांना अगोदर आश्चर्य वाटले आणि सोबत अभिमानही. त्यांनी तिथेच त्यांना रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्याचा होकार दिला. होय, तुम्ही वाचताय ते अतिशय वेगळे असेच आहे.
मालेगावः नवरा रुसला, मंडपात जाऊन बसला. हे चित्र खेड्यापाड्यातच काय मोठमोठ्या शहरातल्या जंगी विवाह (Marriage) सोहळ्यात पाहायला मिळते. कोणाला मोठी चारचाकी हवी असते, तर कोणाला अजून काही. हुंडा, मानपान हे सुद्धा आलेच. त्याची पूर्तता जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत अनेकजण बोहल्यावर चढत नाहीत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या नांदगाव-बोलठाणमध्ये असेच काहीसे घडले. मात्र, ते अतिशय वेगळे होते. समंजस होते. विशेष म्हणजे यातून दुसऱ्यांनी आदर्श घ्यावा असे होते. नवरदेवाची (Navradeva) ही मागणी ऐकुण सासरेबुवांना अगोदर आश्चर्य वाटले आणि सोबत अभिमानही. त्यांनी तिथेच त्यांना रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्याचा होकार दिला. होय, तुम्ही वाचताय ते खरे आहे. तिथेच त्यांनी आपल्या जावईबापूंना रस्ता दुरुस्तीसाठी प्रयत्न करण्याचा होकार दिला आणि सारे चित्र पालटले. सासरेबुवांकडे नवरदेवाने केलेल्या मागणीची मंडपभर चर्चा झाली आणि ती पंचक्रोशीत पसरली.
नेमके प्रकरण काय?
बोलठाण येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश रिंढे यांची कन्या ऋतुजा हिचा विवाहसोहळा औरंगाबाद जिल्ह्यातील गोपाळवाडी इथल्या जयेश जगताप यांच्यासोबत जमला. त्या नंतर नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी विवाहस्थळी येत असताना त्यांना मनेगाव फाटा ते बोलठाण ह्या खड्डेमय झालेल्या 3 किलोमीटर रस्त्यावरून प्रवास करताना खूप त्रास झाला. या त्रासामुळे सर्वच मेटाकुटीला आले होते. विवाह प्रसंगांमध्ये पायघड्या टाकण्यात आल्यानंतर नवरदेव रुसतो व त्यानंतर त्याचा रुसवा दूर करण्यासाठी सासू सासरे त्याची मागणी पूर्ण करतात. मात्र, या नवरदेवाने मला काही नको. आपण फक्त मनेगाव फाटाचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, अशी मागणी केली. यामुळे त्याने सर्वांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला. रस्त्यावरील खड्ड्यामुळे माझ्या वडिलांचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे खड्डे किती घातक आहे याची मला जाणीव असल्यामुळे मी ही मागणी केल्याचे नवरदेव जयेशने सांगितले.
हा मृत्यूचा सापळा
औरंगाबाद-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर हा रस्ता असून तो कन्नड तालुक्याच्या हद्दीत येतो. गेल्या अनेक वर्षांपासून ह्या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. सध्या हा रस्ता इतका खड्डेमय झाला आहे की, वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे रोज अपघात होतात. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. त्यासाठी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप सूर्यवंशी, बोलठाण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद रिढे यांनी पुढाकार घेतला. आता तर थेट नवरदेवाने या समस्येकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे आता तरी या भागातील लोकप्रतिनिधी रस्ता दुरुस्त करतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत.
इतर बातम्याः
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!