Ajit Pawar : याआधी असं कधीच घडलं नव्हतं; अजित पवार नाशिकमध्ये पोहोचताच…

Ajit Pawar on Nashik Daura See Video : अजित पवार आज नाशिकमध्ये आहेत. इथे त्यांचं स्वागत केलं जात आहे. आज शेतकरी मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं आहे. पण नाशकात पोहोचताच कधीही न घडलेली घटना घडली. अजित पवार यांच्या या नाशिक दौऱ्यात नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

Ajit Pawar :  याआधी असं कधीच घडलं नव्हतं; अजित पवार नाशिकमध्ये पोहोचताच...
Follow us
| Updated on: Oct 07, 2023 | 12:49 PM

नाशिक | 07 ऑक्टोबर 2023, मनोहर शेवाळे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जातंय. मोठमोठे हार घालत अजित पवार यांचं स्वागत केलं जातंय. तर राष्ट्रवादीचे नेते पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत करत आहेत. फुलांची उधळण अजित पवार यांच्यावर करण्यात येत आहे. मंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत ओझर विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यादरम्यान अजित पवार यांच्यासोबत एक मोठी घटना घडली आहे. आजपर्यंत अजित पवार यांच्यासोबत असं कधीही घडलं नव्हतं. या घटनेने राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.

अजित पवार यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

अजित पवार हे आज नाशकात आहेत. त्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत केलं जातंय. मात्र या दौऱ्या दरम्यान अजित पवार यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला. कांदा- टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. कांदा आणि टोमॅटो रस्त्यावर फेकत अजित पवार यांचा निषेध यावेळी करण्यात आला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही दिवसांआधी टोमॅटोला चांगला भाव मिळाला मात्र आता पुन्हा एकदा टोमॅटो आणि कांद्याचे भाव गडगडले आहेत. चांगला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अजित पवार यांचा ताफा अडवला. असं या आधी कधीही घडलं नव्हतं. ते आज अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्या दरम्यान घडलं.

उपमुखमंत्री अजित पवार यांनी वणीच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. यानंतर आता ते कळवण दाखल होणार आहे. इथेही त्यांचं भव्य स्वागत केलं जाणार आहे. क्रेनच्या साहाय्याने मोठा हार त्यांना घातला जाईल. ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं जाईल. कळवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अजित पवार पुष्पहार घालणार आहे. शिवरायांना ते अभिवादन करतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील झेंड्याचं देखील अनावरण अजित पवार करणार आहेत. कळवमध्ये मोठ्या संख्येन कार्यकर्ते स्वागतासाठी उपस्थित आहेत. काही वेळातच अजित पवार या ठिकाणी पोहचतील.

महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....