Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सुरू; कुठे मिळेल मदत?

नाशिक जिल्ह्यातील अनेक नागरिक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याचे समोर येत आहे. त्यांना मदत करण्यासाठी आणि भारतात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या मदतकार्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सुरू; कुठे मिळेल मदत?
युक्रेनमध्ये अडकलेल्यांसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 1:50 PM

नाशिकः रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धाने (War) जगात अशांतता निर्माण केली आहे. रशियाच्या आक्रमकतेला सडेतोड उत्तर देण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. आता पुढे काय वाढून ठेवले आहे, याचे उत्तर काळच देईल. त्यामुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीती आहे. तर या युद्धाने नाशिककरांच्या (Nashik) काळजाचा ठोका चुकला आहे. कारण जिल्ह्यातील अनेक नागरिक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याचे समोर येत आहे. त्यांना मदत करण्यासाठी आणि भारतात आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी या मदतकार्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

किती जण युक्रेनमध्ये अडकले?

नाशिकची आदिती देशमुख आणि प्रतीक जोंधळे हे विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. खर्कीव्ह प्रांतातील हॉस्टेलमध्ये ते राहतात. त्यांच्यासोबत इतरही भारतीय विद्यार्थी आहेत. रशियाने गुरुवारपासून युक्रेनवर हल्ला सुरू केल्याने इथल्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये आश्रय घेतला आहे. त्यांचे त्यांच्या कुटुंबाशी बोलणे झाले आहे. त्यामुळेच या कुटुंबांनी या दोन्ही विद्यार्थ्यांना तातडीने भारतात आणावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तातडीने खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे धाव घेतली. या विद्यार्थ्यांना तात्काळ मायदेशी आणण्यात यावे, अशी मागणी केली. खासदारांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून जलद तोडगा काढू, असे आश्वासन दिले आहे. इतरही अनेक विद्यार्थी आणि नागरिक युक्रेनमध्ये अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काय आहे हेल्पलाइन क्रमांक?

युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने हेल्पलाइन तयार केली आहे. त्यात केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली येथील हेल्पलाइन क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत…

– टोल फ्री – 1800118797

– फोन 011-23012113 / 23014104 / 23017905

– फॅक्स 011-23088124

– ई-मेल situationroom@mea.gov.in या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

नाशिकचा क्रमांक काय?

नाशिक जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक 0253- 2317151 या दूरध्वनी क्रमांकावर टोल फ्री. क्रमांक 1077 आणि ddmanashik@gmail.com या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

इतर बातम्याः

टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?

My Husband’s Murder | पतीच्या खुनाची सुपारी देत पत्नीने उगवला सूड; प्रियकराच्या साथीने छळून मारले, मृतदेह दरीत फेकला, अन्…

Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.