AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये गृहनिर्माण संस्थांच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी विशेष मोहीम; कसा घ्याल लाभ?

राज्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणासाठी 1 ते 30 एप्रिल 2022 दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विकासकाच्या नावे असलेल्या जमिनीची मालकी व हक्क सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.

नाशिकमध्ये गृहनिर्माण संस्थांच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी विशेष मोहीम; कसा घ्याल लाभ?
प्रातिनिधिक छायाचित्र.
| Updated on: Apr 06, 2022 | 7:07 AM
Share

नाशिकः राज्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या (Co-operative Housing Society) मानीव अभिहस्तांतरणासाठी 1 ते 30 एप्रिल 2022 दरम्यान विशेष मोहीम (Special campaign) राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत विकासकाच्या नावे असलेल्या जमिनीची मालकी व हक्क सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या नावे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची नोंदणी बाकी आहे, अथवा विकासकाकडून नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीखालील जमिनीचे संस्थेच्या नावे हस्तांतरण झालेले नाही, त्या संस्थांनी 30 एप्रिल 2022 पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन सहकारी संस्थचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी केले आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांना अपार्टमेंट अॅक्ट 1970 अंतर्गत अपार्टमेंट मधील फ्लॅट व युनिट धारकांना देखील सदर योजनेचा लाभ घेता येणार आहे. या मोहिमेंतर्गत नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट ओनशिप अॅक्ट अन्वये नोंदविण्यात आलेल्या अपार्टमेंट मधील सदनिका तसेच युनिट धारकांनी स्थावर मिळकतीचे हस्तांतरण संस्थेच्या नावे करुन घ्यावे, असे आवाहनही जिल्हा उपनिबंधकांनी केले आहे.

कुठे द्याल प्रस्ताव?

योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करुन गृहनिर्माण संस्थांनी त्यांचे मानीव अभिहस्तांतरण बाबतचे प्रस्ताव http://www.mahasahakar.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत. तसेच सदर प्रस्तावाची मूळ प्रत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेच्या कार्यालयास सादर करावी. प्राप्त प्रस्तावावर महाराष्ट्र मालकी हक्कांच्या सदनिकांबाबतचा कायदा (मोफा) 1963 नुसार सुनावणी अंतर्गत निर्णय घेवून गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट मधील सभासद व सदनिका धारकांना अभिहस्तांतरण प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

कोणती कागदपत्रे लागणार?

– विहीत नमुन्यातील (नमुना 7) अर्ज व अर्जामागे रु.2000/- चे कोर्ट फी स्टॅम्प. – सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्र, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, Deed of Declaration ची प्रत. – विकासकाने मंजूर करून घेतलेल्या रेखांकन (Layoul) समाविष्ट असलेल्या सर्वे व गट नंबरचा 7/12 उतारा व मिळकत पत्रिकांचा तीन महिन्याच्या आतील उतारा. – प्रत्येक सभासदाच्या सदनिकेच्या विक्री करारनाम्याची प्रत किंवा इंडेक्स-2 किंवा सदनिकेच्या मालकी हक्काचा पुरवा जसे वारस प्रमाणपत्र, न्यायालयाचा हुकूमनामा किंवा मृत्युपत्र इत्यादी. – सहकारी गृहनिर्माण संस्थेने अभिहस्तांतरण करून देण्यासाठी प्रवर्तकाला बजावलेली कायदेशीर नोटीस. संस्थेतील सर्व कायदेशीर सदनिका धारकांची यादी. – नियोजत प्राधिकरणाने प्रमाणित केलेले बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र. – नियंत्रित सत्ता प्रकार, नवीन अविभाज्य शर्त किंवा भोगवटदार वर्ग-2 अशा नोंदी 7/12 वर किंवा मिळकत पत्रिकेवर असल्यास सक्षम प्राधिकाऱ्‍याची जमीन हस्तांतरणासाठी किंवा बिनशेती करण्यासाठी घेतलेल्या परवानगीच्या आदेशाची प्रत. (लागू असल्यास)

काय होणार फायदा?

– गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट मधील सदनिका धारकांना अभिहस्तांतरणामुळे अनेक फायदे होतात. बिल्डर किंवा जमीन मालक अभिहस्तांतरण प्रक्रियेत असहकार्य करत असल्यास त्यांच्याविरुद्ध दाद मागण्याची व्यवस्था. – मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर हस्तांतरणासाठी बिल्डर, विकासक, जागा मालक यांचे सहकार्यासाठी सदनिका, फ्लॅट धारक, सहकारी गृहनिर्माण संस्थांना अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. – मानीव अभिहस्तांतरणामुळे बिल्डर, विकासक यांचा संबंधित अपार्टमेंट किंवा सोसायटीमधील एफ.एस.आय. टी.डी.आर, वरील दावा व हक्क संपुष्टात. – सातबारा (7/12) उतारा, प्रॉपटी कार्डवर नांव लागल्यानंतर अपार्टमेंट किंवा सोसायटीच्या पुनर्विकासाचा मार्ग सुलभ. – बिल्डर विकासक जमीन मालक यांचेविरूद्ध न्यायालयाीन दाव्यांमध्ये अभिहस्तांरणासाठी जाणारा वेळ व पैसा यांची बचत. – घरांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता घेतलेल्या घराचे संपूर्णत: मालक होण्यासाठी अभिहस्तांतरण प्रक्रिया महत्वाची. – सातबारा (7/12) उतारा, प्रॉपर्टी कार्डवर नाव लागल्यामुळे मालकी हक्काचा लाभ.

इतर बातम्याः

शिवसेना नेते यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला दिलेल्या 2 कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणतात, ही तर माझी आई…!

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.