AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik News | नाशिकमध्ये काय चाललय, नंग्या तलवारी नाचवल्या, कोयत्याने गाड्यांच्या काचा फोडल्या

Nashik News | नाशिकमध्ये पोलीस प्रशासन आहे की, नाही? असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत. दत्त मंदिर चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोडीची घटना घडली.

Nashik News | नाशिकमध्ये काय चाललय, नंग्या तलवारी नाचवल्या, कोयत्याने गाड्यांच्या काचा फोडल्या
Nashik cars vandalise
| Edited By: | Updated on: Jul 25, 2023 | 9:14 AM
Share

नाशिक : नाशिकमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. नाशिकमध्ये पोलीस दल काय करतय? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे. त्याला कारणही तसच आहे. 24 तासांच्या आत नाशिकमध्ये वाहन तोडफोडीची दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे नाशिककर दहशतीमध्ये आहेत. नाशिकमधील ही परिस्थिती चिंता वाढवणारी आहे. 24 तासांपूर्वी नाशिकच्या विहितगावमध्ये वाहनांची तोडफोड करण्यात आली होती.

विहितगावमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 7 ते 8 गाड्या पेट्रोल टाकून जाळण्यात आल्या होत्या. आता नाशिक रोड परिसरात पुन्हा एकदा वाहन तोडफोडीची घटना घडली आहे.

कोयत्याने काचा फोडल्या?

नाशिकमध्ये पोलीस प्रशासन आहे की, नाही? असा प्रश्न नाशिककर विचारत आहेत. दत्त मंदिर चौक परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोडीची घटना घडली. दुचाकीवरुन आलेल्या 6 ते 8 जणांच्या टोळक्याने हैदोस घातला. वाहनांची तोडफोड केली. कोयते आणि नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवण्यात आली. कोयत्याने कारच्या काचा फोडण्यात आल्या. गुंड पोलिसांवर भारी पडतायत का?

कोयते, तलवारी नाचवत हे गुंड शहरभर फिरत असताना, पोलीस काय करतायत? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. शहरातील गुंड पोलिसांवर भारी पडतायत का? असही चित्र यातून निर्माण होतय. आता यामध्ये गृहमंत्र्यांनी लक्ष घालाव अशी मागणी होत आहे. 12 जुलैलाही सिडको परिसरात 16 वाहनांची तोडफोड झाली होती.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.