नाशिक: नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्याने हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकऱ्यांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलासा दिला आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात पाच पट मोबदला मिळवून देण्यात येईल. कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही छगन भुजबळ यांनी दिली आहे. (nashik-pune railway project affected people met chhagan bhujbal)
नाशिक तालुक्यातील नानेगाव व परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी भुजबळांना आपल्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी भुजबळांनी शेतकऱ्यांशी सवांद साधून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याप्रसंगी बाधित शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे, केरू काळे, वासुदेव पोरजे, ज्ञानेश्वर काळे, अशोक आडके, योगेश काळे, प्रकाश आडके, सुकदेव आडके, मुकंद गोसावी, राजाराम शिंदे यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.
मौजे नाणेगांव जिल्हा नाशिक येथे पुणे – नाशिक रेल्वे मार्गाचे भूसंपादन व अधिग्रहीत शेतजमिनीचे मोजणीचे काम सुरू आहे. सदर भूसंपादन हे गावातील 21.5 हेक्टर बारमाही बागायती क्षेत्राचे होणार आहे. या क्षेत्रात द्राक्षे, कांदा, ऊस, फळझाडे व इतर बागायती नगदी पिके घेतली जातात. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व भौगोलिक नुकसान होणार असून बाधित शेतकऱ्यांची जमिन बारमाही बागायती असल्यामुळे तसेच उदरनिर्वाहाचे साधन शेतीच असल्याने जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच रेल्वेलाईनमुळे शेतकऱ्यांच्या क्षेत्राची दोन ते तीन तुकडयात विभागणी होणार असल्याने त्या संपूर्ण क्षेत्राची संमतीनुसार खरेदी करण्यात यावी, द्राक्षबागा निर्यातक्षम दर्जाच्या असल्याने त्या निर्यातदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे द्राक्षबाग शेती क्षेत्राची विभागणी झाल्यास उर्वरीत संपूर्ण द्राक्षबागेची व इतर साधन सामुग्रीची व बांधावरील फळझाडांचा योग्य मोबदला मिळावा. बाधित होणाऱ्या पाईपलाईन 25 मीटरवर क्रॉसिंग होण्याकरीता व्यवस्था असावी. पाईपलाईन विहीर, बोअरवेल यांचा योग्य मोबदला मिळावा. बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त दाखला मिळावा व त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकास नोकरी मिळावी. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त रेड झोन नसावा, गावातील रेल्वेमार्गातील बाधित होणारे वागवहीवाटीचे रस्त्यांना क्रॉसिंग येणे जाण्याची योग्य ती व्यवस्था करावी, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे केलेल्या आहे.
यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा पाच पट मोबदला मिळवून देण्यात येईल. कुठल्याही बाधित शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले. (nashik-pune railway project affected people met chhagan bhujbal)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 14 June 2021https://t.co/AAg9xjE0VT | #MahaFastNews100 | #AjitPawar | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra News LIVE Update | आषाढी वारी 2021 च्या नियोजनास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, आदेश जारी
(nashik-pune railway project affected people met chhagan bhujbal)