AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस पाईपलाईनच्या कामामुळे नाशिककरांचा प्रवास चिखलमय, कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा विरोधी पक्षांचा आरोप

शेकडो कोटी रुपये खर्च करून नव्याने तयार करण्यात आलेले नाशिक शहरातील रस्ते, गॅस पाईप लाईनसाठी खोदण्यात आलेत. पालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीतून यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप लोकप्रतिनधींनी केलाय.

गॅस पाईपलाईनच्या कामामुळे नाशिककरांचा प्रवास चिखलमय, कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा विरोधी पक्षांचा आरोप
Nashik Road work Problem
| Updated on: Jun 24, 2021 | 11:18 AM
Share

नाशिक: शेकडो कोटी रुपये खर्च करून नव्याने तयार करण्यात आलेले नाशिक शहरातील रस्ते, गॅस पाईप लाईनसाठी खोदण्यात आलेत. पालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीतून यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप लोकप्रतिनधींनी केलाय.तर ऐन पावसाळ्यात चांगले चुंगले रस्ते खोदल्याने नाशिककरांचा दररोजच प्रवास चिखलयम झालाय. महापालिका आयुक्तांनी मात्र प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिलाय. (Nashik road problem due to gas pipeline work opposition party leaders accused scam in this work)

नागरिकांचा पालिका अधिकाऱ्यावर कारवाई

अवघ्या वर्षभरापूर्वी नाशिक शहरात तब्बल एक ते दोन हजार कोटी रुपये खर्च करत अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र, पालिकेचे हे रस्ते गॅस पाईप लाईनच्या नावाखाली खोदले गेली. विशेष म्हणजे हे खोदलेले रस्ते पावसाळा सुरू होऊनही दुरुस्त न करण्यात आल्याने पाऊस पडला की चिखलयमय होत आहेत.शहरातील सातपूर, सिडको,पंचवटी,नाशिक रोड अशा सर्वच भागातील रस्त्यांची गॅस पाईप लाईनच्या ठेकेदाराने पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरत नासाडी केल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

महापालिकेचं आर्थिक नुकसान केल्याचा आरोप

शहरातील सामन्य नागरिकांना नळ कनेक्शन अथवा इतर कामासाठी रस्ता खोदायचा ठरला तर तीन ते साडेतीन फुटासाठी 5 हजार रुपये इतका दर आकारला जातो मात्र या ठेकेदाराला केवळ 2 ते 3 हजार रुपये इतका दर आकारत अधिकाऱ्यांनी आर्थिक हितसंबंधातून मेहरबाणी दाखवत पालिकेच आर्थिक नुकसान केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. 205 किलोमीटरच्या रस्ते खुदाई साठी या ठेकदाराकडून नियमांनुसार 160 ते 170 कोटी रुपयांची नुकसान भरपाई घेणं अपेक्षित असताना पालिकेने केवळ 78 कोटी रुपयांची भरपाई घेतल्याने पालिकेच अधिकाऱ्यांच्या चिरी मिरी साठी तब्बल 80 ते 90 कोटींच नुकसान झाल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

चौकशी करण्याचा पालिका आयुक्तांचा इशारा

या गैर कारभाराविरोधात पालिकेच्या महासभेत काही लोकप्रतिनिधींनी आंदोलन करत आवाज उठविण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, महासभा ऑनलाइन असल्याने सत्ताधाऱ्यांनी त्यांना म्युट करत या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत कारवाई करण्यास टाळाटाळ केली असल्याचं विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनी म्हटलं.मात्र पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

नाशिक शहराचा सर्वच भागात गॅस पाईपलाईन च्या नावाखाली रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पालिकेतील शहर अभियंता संजय घुगे आणि संबंधित गॅस पाईपलाईन ठेकेदार यांच्यातील आर्थिक हित-संबंधातून तयार झालेल्या अभद्र युतीमुळे शहरातील रस्त्यांची नासाडी झाली आहे. त्यामुळे पालिकेतील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी कारवाई करो अथवा ना करो मात्र भविष्यात या प्रकरणाची शासनाकडून चौकशी झाली तर या भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्यांना गजाआड व्हावं लागेल हे देखील तितकंच खर आहे.पालिकेच्या याच विभागात या पूर्वी भुयारी गटार,पावसाळी गटार प्रकरणात अनेक अधिकाऱ्यावंर निलंबनाची कारवाई झाल्याचही सर्वश्रृत आहे. त्या मुळे आता याच विभागात या गॅस पाईप लाईनच्या भ्रष्टाचाराचे नवे प्रकरण समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संबंधित बातम्या:

मालेगावात यंत्रमाग उद्योगाला अवकळा; कापडाला मागणीच नसल्याने कारखाने पुन्हा बंद

नाशिकमधील वृद्ध शेतकरी हत्या प्रकरण, झारखंडमधून संशयिताच्या मुसक्या आवळल्या

(Nashik road problem due to gas pipeline work opposition party leaders accused scam in this work)

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.