फडणवीसांकडे फक्त स्टेशनवरचा फोटो, पण आमच्याकडे…; ‘त्या’ ट्विटला संजय राऊतांचं प्रत्युत्तर
Sanjay Raut on Devendra Fadnavis Tweet About Ram Mandir Inauguration : देवेंद्र फडणवीस यांच्या त्या ट्विटल संजय राऊतांचं उत्तर... संजय राऊत नेमकं काय म्हणाले? नाशकातून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. तसंच त्यांनी फडणवीसांना नाशिकला आमंत्रितही केलं आहे.
चैतन्य गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी- नाशिक | 21 जानेवारी 2024 : उद्या अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट केला. हा फोटो नागपूर रेल्व स्टेशनवरचा हा फोटो असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्या या ट्विटला ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हाला काय पुरावा द्यायचा? तुमचे लोक तिथून पळून गेले. बाळासाहेब ठाकरेंनी याची जबाबदारी स्विकारली. नागपूरच्या स्टेशनवरचा फोटो आहे. आमच्याकडे घुमटावरचे फोटो, व्हीडिओ आहेत. तुम्ही नागपूर स्टेशनवर फिरायला गेला असाल, असं संजय राऊत म्हणाले.
राऊतांचं प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्विट केलं? मला माहित नाही. त्यांनी शिवसेनेच्या सहभागी विषयी प्रश्न उपस्थित केले होते. असे प्रश्न विचारणं हे कोत्या आणि संकुचित वृत्तीचं लक्षण आहे. अख्या देशाला माहित आहे, शिवसेनेने काय केलं ते. आम्ही कारसेवकांचा अधिवेशनात सत्कार करणार आहोत. आमच्याकडे देखील फोटो आहे, आम्हाला पुरावे द्यायची गरज नाही. तुमच्याकडे नागपूर स्टेशनचे फोटो आहे, आमच्याकडे घुमटावरचे फोटो आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट जसंच्या तसं
जुनी आठवण…
नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र.
छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे…
नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे.
जुनी आठवण… नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत… pic.twitter.com/v3NFbCSY1v
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2024
आमच्याकडे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती सगळ्यांचे फोटो आहेत. देवेंद्र फडणवीस तुम्ही डेमॉक्रसी क्लबला या. तुम्हाला कारसेवक बघायला मिळतील. तुम्ही विचारता शिवसेनेचे योगदान काय, त्यावेळी हे समजण्याइतकं तुमचं वय नव्हतं. तुम्ही इतिहास समजून घ्या, आणि योगदान काय, यावर भाष्य करा. इथं फक्त ऑपररेशन कमळ होत नाही. ऑपरेशन बाबरी पण होतं, असं संजय राऊत म्हणालेत.