Nashik | सटाणा न्यायालयाला नवीन इमारत मिळणार; 10 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर, काय असतील सोयी-सुविधा?

नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे नवीन विस्तारित न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मा. उच्च न्यायालय यांच्याकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा केला आणि त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे.

Nashik | सटाणा न्यायालयाला नवीन इमारत मिळणार; 10 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर, काय असतील सोयी-सुविधा?
नाशिक जिल्ह्यातील सटाणा न्यायालयाला लवकरच नवीन इमारत मिळणार आहे.
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 9:45 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील सटाणा (Satana) न्यायालय (Court) आता कात टाकणार आहे. या न्यायालयाच्या नूतन इमारतीचे काम लवकरच सुरू होणार असून, त्यासाठी तब्बल 10 कोटी 37 लाख रुपयांचा निधी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विशेष प्रयत्नांतून निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. सटाणा न्यायालयाची इमारत अतिशय जुनी झाल्याने आणि कामकाज करण्यात जागा कमी पडत असल्याने सटाणा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. पंडित भदाणे, अॅड. रवींद्र पगार व नाशिक बार असोसिएशनचे सचिव अॅड. जालिंदर ताडगे यांनी सटाणा न्यायालय विस्तारित इमारतीच्या बांधकामासाठी निधी द्यावा, अशी मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी केली होती.

अन् अखेर प्रश्न मार्गी

मंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सटाणा न्यायालय इमारतीच्या बांधकामाबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रस्तावास शासनाची मंजुरी मिळाली असून इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सटाणा येथे नवीन विस्तारित न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मा. उच्च न्यायालय यांच्याकडून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी पाठपुरावा केला आणि त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे.

कशी असेल नवीन इमारत?

सटाणा न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून, यासाठी दहा कोटी सदोतीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून या नूतन इमारतीत दोन मजली वाहनतळ, गॅस पाइप, बायो डायजेस्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर रुफ टॉप, दिव्यांगांसाठी रॅम्प, फर्निचर, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, अग्निशमन यंत्रणा,आवरभिंत व गेट, अंतर्गत रस्ते, मैदानाचा विकास, वाहनतळ, अंडरग्राउंड पाण्याची टाकी, पंप हाऊस, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटीव्ही यंत्रणा विकसित करण्यात येणार आहे. दरम्यान, लवकरच या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्याचे जिल्ह्यातील वकिलांनी स्वागत केले आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.