AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाचं मंथन; महापालिकेच्या निवडणुकीआधी…

Nashik Shivsena Uddhav Thackeray Group Meeting : आज नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची बैठक होणार आहे. या बैठकीत निवडणुकीतील पराभवावर मंथन केलं जाणार आहे. तसंच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आखणी केली जाणार आहे. वाचा सविस्तर बातमी......

निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरे गटाचं मंथन; महापालिकेच्या निवडणुकीआधी...
| Updated on: Nov 27, 2024 | 10:08 AM
Share

महाराष्ट्र विधानसभ निवडणूक झाली. या निवडणुकीच्या निकालात महायुतीला मोठं यश मिळालं. 230 जागा महायुतीच्या निवडून आल्या. तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. असं असताना आता ठाकरे गटाने या पराभवाची कारणं शोधण्यासाठी आणि निवडणुकीतील पराभवाचं मंछन करण्यासाठी नाशिकमध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील अपयश, ईव्हीएम विरोधी आंदोलन आणि आगामी महापालिका निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाची मंथन बैठक

नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक होणार आहे. निवडणुकीच्या पराभवावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्तीय कार्यालयात बैठक संपन्न मात्र बैठकीत प्रसार माध्यमांना करण्यात मनाई आली आहे. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्यासाठी रणनीती ठरवण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुखासह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती बैठक होणार आहे.

नाशिक जिल्ह्यात ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. ठाकरे सेनेच्या पदाधिकारी बैठकीत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून मोठी आर्थिक उलाढाल आणि ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा ठेवण्यात आलेला आरोप यावर चर्चा होणार आहे, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवरही ठाकरे गटाची नाराजी आहे.

नाशिकमध्ये मतमोजणी होणार?

नाशिक पश्चिम मतदारसंघात पुन्हा फेर मतमोजणी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक आयोग कडे पत्र व्यवहार करत मागणी केली होती. एकूण असलेल्या बूथ पैकी पाच टक्के बूथ वरील फेर मतमोजणी होण्याची शक्यता आहे. फेर मतमोजणीसाठी एक बुथसाठी 40 हजार रुपये शुल्क आणि GST भरण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सुधाकर बडगुजर यांना पत्र दिले आहे. मतमोजणीनंतर अनेकांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली होती. याच मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांनी देखील फेर मतमोजणीची मागणी केली आहे. आता ही फेर मतमोजणी होण्याची शक्यता आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.