क्रेडिबिलिटी असणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यावं; नितेश राणे यांच्या टीकेला वरूण सरदेसाई यांचं एका वाक्यात उत्तर

Varun Sardesai on Nitesh Rane : आदित्य ठाकरेंनी संधी दिली म्हणून युवा नेते झाले अन् आता...; राहुल कनाल यांच्यावर वरूण सरदेसाई यांचा घणाघात

क्रेडिबिलिटी असणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यावं; नितेश राणे यांच्या टीकेला वरूण सरदेसाई यांचं एका वाक्यात उत्तर
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 3:09 PM

नाशिक : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार आहेत. त्यावर ठाकरे गटाचे युवा नेते वरूण सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांना वेगवेगळ्या संध्या देण्यात आल्या. आदित्य ठाकरे यांनी संधी दिली म्हणून ते युवानेते झाले. नेते झाले म्हणून अन्याय झाला का? आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करावे म्हणून कमी लोकांना संधी मिळते. म्हणून महत्वकांक्षा वाढते, असं म्हणत वरूण सरदेसाई यांनी भाष्य केलंय.

भाजपचे नेते नितेश राणे यांनी वरूण सरदेसाई यांना टोला लगावला आहे. जस उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत शकुनी आहे. तसं वरूण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील शकुनी आहे, असं नितेश राणे म्हणालेत. त्याला वरूण सरदेसाई यांनी उत्तर दिलं आहे.

क्रेडिबिलिटी असणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायचं. ज्याला जे बोलायचे असते, ते बोलुद्या… कुणी उठून काहीही बोलेल, सगळ्याच गोष्टींना उत्तरं नसतात द्यायची, असं ते म्हणालेत.

उद्या मोर्चा निघणारच!

उद्या शिवसेना आणि युवसेना मुंबई महापालिकेवर मोर्चा काढत आहे. हा महामोर्चा आहे, त्यात शिवसैनिक आणि सामान्य नागरिक सुद्धा सहभागी होणार आहेत. एकही निवडणूक घेतली जात नाहीये. आदित्य ठाकरे एक एक घोटाळा बाहेर काढत आहेत. म्हणून भाजप ही मोर्चा काढत आहे, पण तो त्यांचा निर्णय, असं वरूण सरदेसाई म्हणालेत.

ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीने झाडाझडती घेतली. त्यावर बोलताना, सूरज हे माझे जवळचे सहकारी आहेत. शिवसेनेचे निष्ठावंत वाघ आहेत. ते चौकशीला सामोरे जात आहेत. संघटनेचं काम देखील सुरू आहे. भाजपवर जे बोलत आहे, त्यांच्यावर धाडी पडत आहे, असं म्हणत वरूण यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार का नाही?

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यावर बोलताना एक वर्ष सरकार येऊन झालं. वर्षे होऊन सुद्धा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही हे त्यांचं अपयश आहे. एकाला मंत्रिपद दिलं तर बाकीचे बुटाचे लेस बांधून तयारआहेत. वर्ष कशाला लागत आहे. वेगवेगळ्या तारखा देत आहे. काहींचे सुट कपाटमध्ये आहेत, ते खराब झालेत. मग मंत्रिमंडळ विस्तार का नाही, असा सवाल वरूण यांनी विचारला आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.