लासलगांव पाठोपाठ येवला बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय, 70 वर्षांची प्रथा बंद, अमावस्येला लिलाव सुरु

अमावस्येच्या दिवशी लासलगाव नंतर आता येवल्यात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याची परंपरा मोडकळीस काढा असे आदेश राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते.

लासलगांव पाठोपाठ येवला बाजार समितीचा ऐतिहासिक निर्णय, 70 वर्षांची प्रथा बंद, अमावस्येला लिलाव सुरु
येवला बाजार समितीत अमावस्येला लिलाव सुरु
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 2:05 PM

नाशिक (येवला): आशिया खंडातील कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नंतर आता येवला बाजार समितीनेही अंधश्रद्धेचा कळस उतरवला आहे. अमावस्येच्या दिवशी लासलगाव नंतर आता येवल्यात कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याची परंपरा मोडकळीस काढा असे आदेश राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार यांनी या आदेशाची तातडीने अमलबजावणी केल्याने आज प्रथमच 70 वर्षानंतर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांद्याचे लिलाव सुरु झाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले

70 वर्षांची पंरपरेला मुठमाती

शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली. सन -1952 मध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली 1955 मध्ये कामकाजाला सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत 70 वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्याला कांदा आणि धान्याचे लिलाव बंद ठेवण्याची ही परंपरा बंद करा असे आदेश मंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर आले असताना दिले होते.

सोमवती अमावस्येला लिलाव सुरु

आज पोळा आणि श्रावण महिन्याची आमवस्या असल्याने या परंपरेला फाटा देत आज अमावस्येच्या दिवशी येवला बाजार समिती आवारात कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांनी या निर्णयाला चांगला प्रतिसाद देत आपल्या 250 वाहनातील 5 हजार क्विंटल कांदा आवक विक्रीसाठी आणला होता. त्या कांद्याला कमाल 1670 रुपये ,किमान 500 रुपये तर सर्वसाधारण 1400 रुपये इतका बाजार भाव मिळाला आहे. दर महिन्याच्या अमावस्याला कांदा आणि धान्य लिलाव सुरु केल्याने आता शेतकर्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे, असं येवला बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी वसंत पवार आणि शेतकरी विष्णू चव्हाण यांनी सांगितलं आहे.

लासलगाव बाजारसमितीकडून 75 वर्षांच्या परंपरेला फाटा

कांदा म्हटले की चटकन तोंडात नाव लासलगावचे येते. मग ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत असो लासलगावची चर्चा होतं असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्यावतीने प्रत्येक राज्यांमध्ये बाजार समितीची राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आल्या. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1 एप्रिल 1947 मध्ये लासलगाव बाजार समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत 75 वर्षांपासून एक परंपरा अवलंबली जात होती. ती म्हणजे दर महिन्याला येणाऱ्या अमावस्याला कांदा व धान्याचे लिलाव बंद ठेवणे होय. मात्र, जून महिन्यातील अमावस्येपासून लिलाव सुरु करण्यात आले आहेत.

इतर बातम्या

TV9 Marathi Impact: लासलगावात स्त्री शक्तीचा विजय, कांदा लिलावात सहभागी होण्यास व्यापाऱ्यांची सहमती

Onion Price Today: शेतकऱ्यांच्या मागणीला यश, आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजार समिती सुरु

Nashik Yeola APMC stop seventy years old tradition to close auction on Amavasya of each month today

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.