Nashik Oxygen Tank Leak | नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, 22 जणांचा गुदमरुन मृत्यू, नेमकं काय घडलं?

ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने 22 रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. यात 11 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे. (Nashik Hospital Oxygen Tank Leak tragedy)

Nashik Oxygen Tank Leak | नाशिकमध्ये मृत्यूचं तांडव, 22 जणांचा गुदमरुन मृत्यू, नेमकं काय घडलं?
Nashik Oxygen Leakage
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 4:10 PM

नाशिक : नाशिकमध्ये महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain Hospital) ऑक्सिजनची गळती (Oxygen Tank Leak)  झाली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने 22 रुग्णांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. यात 11 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेतील मृताच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार आहे. (Nashik Zakir Hussain Hospital Oxygen Tank Leak tragedy)

नेमकं काय घडलं?  

नाशिक शहरात महापालिकेचे झाकीर हुसेन रुग्णालय आहे. हे रुग्णालय कोविड रुग्णांसाठी जीवदान ठरत आहे. मात्र ऑक्सिजन पुरवठा आणि कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे हे रुग्णालय नेहमी चर्चेत राहिले आहे. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळं नोझल तुटले. त्यामुळे ही ऑक्सिजन गळती झाल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिकच्या ऑक्सिजनची गळती झाल्यानंतर रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली. या रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकला गळती लागल्याने हजारो लीटर ऑक्सिजन वाया गेले. यावेळी अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. यातील 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयात अचानक ऑक्सिजन लीक झाल्याने रुग्णांना होणारा पुरवठा बंद झाला. त्यामुळे व्हेंटिलेटवर असलेल्या रुग्णांपैकी 22 जणांचा तडफडून मृत्यू झाला. यात 11 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दीड तासांनी गळती रोखण्यास यश

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी अथक प्रयत्न सुरु होते. जवळपास एक ते दीड तासानंतर ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला  ही गळती रोखण्यास यश आले. या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये  

या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच. या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. (Nashik Zakir Hussain Hospital Oxygen Tank Leak tragedy)

संबंधित बातम्या :

Nashik Oxygen Tank Leak Video : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती, तब्बल 22 जणांचा मृत्यू

‘माझी मम्मी क्लीअर झालेली, ऑक्सिजन संपला, फडफड कोंबडीवाणी मेली ती’, झाकीर रुग्णालयाबाहेर महिलेचा आक्रोश

Nashik Oxygen Tank Leak : नाशिकमध्ये ऑक्सिजन अभावी तब्बल 22 जणांचा मृत्यू, आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.