“भाजपची भिस्त आमच्या तिन्ही पक्षांवर”; पदवीधर निवडणुकीचा वाद राष्ट्रवादीच्या नेत्यानं फोडून सांगितला…
नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे जोरदार ढोल वाजू लागले आहेत. काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे येथील राजकीय गणितं बदलली आहेत.
नाशिकः पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून आणि सत्यजित तांबे व शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीवरून चाललेल्या वाद आता प्रचंड वाढला आहे. त्यातच सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यामुळे काँग्रेस आणि सत्यजित तांबे यांच्यामध्येही आता आंतर पडत आहे. त्यामुळे नाशिक उमदेवारीवरून वाद टोकाला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट शुभांगी पाटील या आमच्याच उमेदवार असल्याचे स्पष्ट केले.
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीवरून नाशिकच्या राजकारणात प्रचंड मोठ्या हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच शुभांगी पाटील या आमच्याच उमेदवार असल्याचे सांगत मी काही दिवस नाशिकला येऊ शकलो नाही मात्र कामाला जोरदार सुरुवात झाली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून नाशिकमध्ये आता काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचेही दिसून येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शुभांगी पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते अनुपस्थित असल्याचेही दिसून आले.
सध्या तीन पक्ष एकत्र येत असून प्रत्येक पक्ष आपापल्या सभा घेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी तिन्ही पक्ष काम करत आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नाशिकमध्ये पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे जोरदार ढोल वाजू लागले आहेत. काँग्रेसच्या सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे येथील राजकीय गणितं बदलली आहेत. तर प्रचारादरम्यान सत्यजित तांबे यांनी बोलताना सांगितले की, आपल्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत.
त्यामुळे आपाल्या काँग्रेसचाही पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावर बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितले की, काँग्रेस म्हटल्यानंतर सोनिया गांधी, खर्गे साहेब, नाना पटोले ही खरी काँग्रेस आहे. त्यामुळे ते कितीही सांगत असले तरी सगळ्यांना माहिती आहे की, खरा उमेदवार कोण आहे असा टोला त्यांनी सत्यजित तांबे यांना लगावला आहे.
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची आघाडी होणार असल्याचे बोलले जात असताना महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे.
त्यावर बोलताना आणि आघाडीविषयी सांगताना ते म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीसोबत बोलण्याचे काम उद्धव ठाकरे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.