‘नारायण राणे अर्वाच्च्य भाषा वापरुन शिवसैनिकांना चिथावणी देतायत, पंतप्रधान मोदींनी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगावा’

Shivsena | नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदाच्या रुपाने चांगले काम करण्याची आणि राजकीय भविष्य सुधारण्याची संधी मिळाली होती. परंतु, नारायण राणे यांनी ती संधी वाया घालवली. केंद्रीय मंत्र्याला शपथ देताना कोणत्याही राज्याविषयी, नेत्याविषयी आकस बाळगणार नाही, अशी शपथ दिली जाते.

'नारायण राणे अर्वाच्च्य भाषा वापरुन शिवसैनिकांना चिथावणी देतायत, पंतप्रधान मोदींनी त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगावा'
नारायण राणे, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 7:53 AM

नाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अर्वाच्च्य भाषा वापरुन शिवसैनिकांना चिथावणी देत आहेत. अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्याकडून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा मागितला पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केली.

नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदाच्या रुपाने चांगले काम करण्याची आणि राजकीय भविष्य सुधारण्याची संधी मिळाली होती. परंतु, नारायण राणे यांनी ती संधी वाया घालवली. केंद्रीय मंत्र्याला शपथ देताना कोणत्याही राज्याविषयी, नेत्याविषयी आकस बाळगणार नाही, अशी शपथ दिली जाते. नारायण राणे यांनी त्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगावा, असे सुधाकर बडगुजर यांनी म्हटले.

नारायण राणे यांनी सोमवारी महाडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. याविरोधात सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांच्या सायबर सेलने राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच नाशिक पोलीस आयुक्तांनी नारायण राणे यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत.

नारायण राणे नेमंक काय म्हणाले होते?

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

संबंधित बातम्या : 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पातळी सोडून टीका करणाऱ्या नारायण राणेंवर गुन्हा दाखल

Video : ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंची जीभ घसरली

मुख्यमंत्र्यांबद्दल राणे म्हणाले, मी असतो तर कानाखाली चढवली असती, आता शिवसेनेचं जशास तसं उत्तर

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.