राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; दंगल नियंत्रण पथकही तैनात

९ मंत्री सोडले तर बहुतेक सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हंटलं. त्यामुळे राज्यात शरद पवार आणि अजित पवार अशी दोन गट तयार झाली आहेत. आता कार्यालयावरून या गटात वाद सुरू झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; दंगल नियंत्रण पथकही तैनात
Follow us
| Updated on: Jul 04, 2023 | 4:27 PM

नाशिक : मुंबईतील मंत्रालयासमोर अजित पवार गटाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. राज्यातील प्रमुख शहरात आता कोण कोणत्या गटात जातो. यावरून अजूनही स्पष्टता नाही. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आमच्यासोबत ४० आमदार असल्याचा दावा केला. तर ९ मंत्री सोडले तर बहुतेक सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचं शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हंटलं. त्यामुळे राज्यात शरद पवार आणि अजित पवार अशी दोन गट तयार झाली आहेत. आता कार्यालयावरून या गटात वाद सुरू झाले आहेत.

बैठक घेण्यावरून वाद

नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत मिळून हे कार्यालय आपल्या हातात घेतले. यावरून शरद पवार गटाचे काही लोकं नाराज झाले आहेत. त्यांनी बंडाची भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच कार्यालयात बैठक घेण्यावर ठाम आहेत. यावरून हा वाद निर्माण झालाय.

कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त

शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी कार्यालयावर दाखल झाले आहेत. शरद पवार गटाचे पदाधिकारी बैठक घेण्यावर ठाम आहेत. मात्र बैठकीसाठी राष्ट्रवादी कार्यालयात येऊ देणार नाही, असा अजित दादा-भुजबळ गटाने इशारा दिला आहे. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक देखील राष्ट्रवादी कार्यालय बाहेर तैनात करण्यात आले आहे.

इंदापूर तालुका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडे

तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरिता इंदापूर तालुका अजित पवारांसोबत आहे. भविष्यात अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येतील, असा दावा तालुका अध्यक्ष कोकाटे यांनी केला आहे. आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्याशी चर्चा करून निर्णय, असेही कोकाटे म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.