चर्चा तर होणारचः राज ठाकरे आज नाशिकमध्ये; पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) आजपासून (22 सप्टेंबर) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी (Municipal Corporation elections) त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चर्चा तर होणारचः राज ठाकरे आज नाशिकमध्ये; पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत
राज ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 10:24 AM

नाशिकः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) आजपासून (22 सप्टेंबर) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी (Municipal Corporation elections) त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Raj Thackeray Today in Nashik, there will be a big change in the party organization)

आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. यापूर्वी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि पक्षांच्या इतर नेत्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शाखा अध्यक्षांच्या नियुक्तीवर राज ठाकरे मान्यतेचा ठसा उमटिवणार असल्याचे समजते. मनसेमध्ये शाखा अध्यक्ष हे सर्वात महत्त्वाचे पद असून, गेल्या महिन्यापासून या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पक्षाचे तरुण नेतृत्व अमित ठाकरे बाळासाहेब नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी मंगळवारी राजगडावर शाखा अध्यक्षाच्या यादीवर शेवटचा हात फिरवला. यावेळी इच्छुकांशी संवाद साधला. या बैठकीसाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार ईचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी उपस्थित होते.

पक्षातल्या कुरबुरी थांबवणार नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गटबाजी तशी जुनीच आहे. या गटबाजीमुळे अनेकांनी पक्ष सोडला. मात्र, अजूनही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी सुरू असतात. त्यामुळे पक्षाचे कार्यक्रम असो, बैठका असो, की पक्षश्रेष्ठींनी दिलेले आदेश किंवा आंदोलने. एकमेकांना विश्वासात न घेताच त्यांचे नियोजन केले जाते. त्यामुळे राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये विशेष लक्ष घातले आहे. यापूर्वीही एकदा त्यांनी नाशिक दौरा केला. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या.आता पुन्हा एकदा राज ठाकरे येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी स्वतः लक्ष घातल्याने येती महापालिका निवडणूक रंगतदार होणार आहे.

फेब्रुवारीत निवडणुका राज्यात फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. नववर्षांत पुन्हा एकदा निवडणुकाचा हंगाम असून, आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय धुळवडीची रंगत वाढणार आहे. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या महापालकांमध्ये राजकीय नेत्यांच्या प्रचाराचा जोर जास्त असण्याची शक्यता आहे. (Raj Thackeray Today in Nashik, there will be a big change in the party organization)

इतर बातम्याः

कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यास मागता येईल दाद; पोलिसांविरुद्धच्या तक्रारीसाठी नाशिकमध्ये प्राधिकरण

आमची किडनी विका, पण रस्ते करा; हतबल जळगावकरांची महापालिकेकडे आर्त विनवणी

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.