…तोपर्यंत एकाही मंत्र्यांला फिरकू देणार नाही; राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा
Raju Shetti on Milk Rate and Farmer Protest : शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दुधाच्या दरावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. वावातील दूध परिषद आणि शेतकरी मेळाव्यात बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारवर ह्ल्लाबोल केला आहे. वाचा सविस्तर...
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी गावात भव्य दूध परिषद आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दूध परिषद आणि शेतकरी मेळावा पार पडला. दूध परिषद आणि शेतकरी मेळाव्यातून सात मागण्याचे ठराव केले गेले आहेत. या मेळाव्यात बोलताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे. जोपर्यंत दुधाला चाळीस रुपये बाजार भाव मिळणार नाही. तोपर्यंत एकही मंत्र्यांना फिरवून देणार नाही. मंत्र्यांना दूधाने आंघोळ घालावी. 40 बाजार भाव द्या नाहीतर मग भेसळखोरांवरवर कारवाई करा, असं राजू शेट्टी म्हणाले.
दूध परिषदेला शेट्टी यांचं संबोधन
दूध परिषदेच्या निमित्ताने सरकारला या ठिकाणी आपल्याला इशारा द्यायचा आहे. असं काहीतरी मोठा रस्ता रोको आंदोलन झाले. सरकारला सोमवारपर्यंत वेळ दिली आहे. सरकारने दखल न घेतल्यास असे आंदोलन तीव्र केले जाईल. आता जेलमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्कार करण्यात आले. सत्कार झालेल्या शेतकऱ्यांनी दुधाला भाव मिळावा त्यासाठी आंदोलन केले. सरकार कुठलंही असलं तरी त्या सरकारचे ध्यान मुंबईवर असते, असं राजू शेट्टी म्हणाले.
मुंबईचे दूध तोडण्यासाठी त्यावेळी आंदोलन केले. विलासराव देशमुख मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना मी आमदार होतो. मुंबईमध्ये दूध आणण्यासाठी गुजरातला गेले. गुजरातवरून येणारे टँकर आम्ही अडवले. रात्री दोन वाजता विलासराव देशमुख यांची अमेरिकेवरून मला फोन आले होते. अमेरिकेत असून सुद्धा मला विलासराव देशमुख यांचा फोन आला. आर. आर.पाटील यांच्यासोबत माझी बैठक झाली. त्यावेळी विलासराव देशमुख यांनी माझा शब्द पाळाला. पुन्हा दहा वर्षांनी मुंबईचा दूध मुंबईचे ही भूमिका घेतली, अशी आठवणीही राजू शेट्टी यांनी सांगितली.
यंदाच्या बजेटवर भाष्य
आता अधिवेशन चालू आहे. त्यावेळी मी माझ्या खासदारकीचा उपयोग केला. मी रेल्वे रोडवर जाऊन बसलो.. मला मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला. त्यांना त्यावेळी दुधाला पाच रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो अशी घोषणा करावी लागली. एक लिटरला अनुदान देण्याची पद्धत त्यावेळी सुरू झाली. यावर्षी बजेटमध्ये अजित दादांनी घोषणा केली. मात्र अनेक निकष लावले जातात. अनुदानातून किती लोकांना बाजूला करण्यात येईल यासाठी प्रयत्न केले जाते, असंही राजू शेट्टी म्हणाले.