AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एक ‘भाविक’ हरपला; नाशिकचे प्रख्यात तबलावादक पंडित विजय हिंगणे यांचे निधन

नाशिक जिल्ह्यात गेल्या साठ वर्षांपासून तबला रुजवणारे प्रख्यात तबलावादक पंडित विजय हिंगणे यांचे शनिवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.

आणखी एक 'भाविक' हरपला; नाशिकचे प्रख्यात तबलावादक पंडित विजय हिंगणे यांचे निधन
पंडित विजय हिंगणे, नाशिक.
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 5:45 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात गेल्या साठ वर्षांपासून तबला रुजवणारे प्रख्यात तबलावादक पंडित विजय हिंगणे यांचे शनिवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे.

हिंगणे यांना श्वसनाचा त्रास होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाचा आज शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे गेल्या साठ वर्षांपासून नाशिकमध्ये तबल्याचा वटवृक्ष लावणारे आणि त्याची जोपासणा करणाऱ्या मनस्वी कलावंताला नाशिककरांनी गमावले आहे. हिंगणे यांनी नेहमीच तरुण तबलावादकांना घडवण्याचे काम केले. त्यांना सतत प्रोत्साहन दिले. मुंबई, पुण्यासह राज्यभरातील प्रख्यात तब्बलजी नाशिकला कसे येतील, त्यांचे कार्यक्रम इथे कसे होतील, यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. भानुदास पवार, कमलाकर वारे या मित्रांच्या साथीने हिंगणे यांनी नाशिकमध्ये तबल्याचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांच्या जाण्याने तबला वादन क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे हळहळ व्यक्त होत आहे.

‘त्या’ मैफलीने आयुष्य बदलले

नाशिकच्या तीन तबलावादकांची ख्याती सर्वदूर होती. त्यात एक म्हणजे कै. पं. भानुदासजी पवार, दुसरे पं. विजय हिंगणे आणि तिसरे पं. कमलाकर वारे. या तिघांच्या नावाच्या आद्याक्षरांवरून संगीत क्षेत्रामध्ये त्यांची ‘भाविक’ या नावाने ओळख होती. तिघेही मित्र. नाशिकमध्ये दर्दी कलावंत यावा यासाठी झटणारे. हे तिघे मिळून 1960 च्या सुमारास अभिषेकीबुवांच्या मैफलीला गेले आणि तेथे चक्क तबल्याच्या प्रेमात पडले. या मैफलीस शशिकांत उर्फ पंडित नाना मुळे यांनी तबल्यावर साथसंगत दिलेली. नानांची साथसंगत या तिघांनाही इतकी आवडली की, विचारू नका. विशेष म्हणजे नाना त्यांच्याच वयाचे. त्यामुळे यांची गट्टी जमली. सोबत गुरू-शिष्याची परंपराही सुरू झाली. नाना अनेक कार्यक्रमांसाठी आणि नाटकांसाठी नाशिकमध्ये येत. तेव्हा ते आवर्जुन मुक्काम करत. तिघांनाही तबल्याचे धडे देत. नाशकातल्या प्रसिद्ध हिंगणे गणपतीच्या पारावर रात्री सुरू झालेला रियाज पहाटेपर्यंत चालायचा. उ.अहमदजान थिरकवाँ यांचे शिष्य पं. नारायण जोशी यांनी नाशिकमध्ये या ‘भाविकां’च्या मदतीने आपले तबल्याचे पुस्तक लिहून पूर्ण केले. त्यांच्यामुळे उस्ताद अहमदजान थिरकवाँ यांचा तबलाही ‘भाविकां’नी तर आत्मसात केलाच, सोबत इतरांनाही तो शिकवला. प्रख्यात तबलावादक पंडित ओंकार गुलवाडी काही काळ नाशिकच्या कॅनरा बँकेत नोकरीला होते. त्यांनीही ‘भाविकां’ना तबल्याचे धडे दिले. प्रख्यात तबलावादक सुरेश तळवलकर यांनीही ‘भाविकां’ना मार्गदर्शन केले. अशा तबला क्षेत्रातल्या मोठमोठ्या आसामी या ‘भाविकां’नी नाशिकमध्ये आणल्या. या ‘भाविकां’मुळे नाशिकमध्ये तबल्याचे वातावरण तयार झाले. अनेक नवे तब्बलजी त्यांनी तयार केले. आता यातला एक भाविक हिंगणेंच्या रूपाने इहलोकीची यात्रा संपवून गेल्याने हळहळ होत आहे.

नाशिकमध्ये तबला रुजवण्याचे काम पंडित विजय हिंगणे यांनी केले. त्यांनी माझ्या वडिलांसोबत काम केले. नाशिकमध्ये तबल्याची नवी पिढी घडवली. अनेक उत्तमोत्तम कार्यक्रम इथे घेतले. एक चांगले सांस्कृतिक वातावरण निर्माण केले. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. – नितीन पवार, तबलावादक

इतर बातम्याः

शिवारतुंबव्या पावसाचे नाशिकमध्ये थैमान; गोडबार छाटणीपूर्वीच द्राक्षबागांवर नांगर, पिकांचा चिखल अन् शेताचे तळे!

नको, नको म्हणतानाही बहाद्दराने पुरात घातली गाडी; नाशिकमधली चित्तथरारक घटना!

नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणारच; नोव्हेंबरच्या तारखांची चाचपणी

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.