Sadabhau Khot : आता यांना नववा महिना लागला का? म्हणून रडताहेत, सदाभाऊ खोतांचा महाविकास आघाडीला खोचक टोला
कोरोनाच्या काळात सुद्धा गाव गाड्याचा माणूस शेतामध्ये राबत होता आणि तुम्ही मात्र अजून मास्क लावून आपल्याला काय होईल का झालं तर आपल्या संपत्तीचा काय करायचं? या चिंतेने ते स्वतःची काळजी घेत आहेत. आता तुम्ही जनतेचे काळजी घ्या असे सदाभाऊ खोत म्हणाले.
नाशिक : गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचे सहयोगी आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे सतत महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट करत आहे. आजा पुन्हा तेच दिसून आलं. मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) हे भगव्यातून आता हिरव्यात आलेले आहेत .त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्वप्न बाळगलेले होतं. त्या स्वप्नाचा चक्काचूर करण्याचे काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यात जनतेला हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला बहुमत दिलेले होतं. पण विश्वास घात करून ते सत्तेवर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या बोलवता धनी हा बारामतीला आहे. मुख्यमंत्री नामदारी आहेत आणि जसे एखादं बियाणे पेरल्यानंतर उगवतं नसतं. तसे मुख्यमंत्री काही बोलले तर त्याला पीक येत नाही त्यांच्या बोलण्याला काही सुद्धा अर्थ नाही, अशी सडकडून टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी जरा घराच्या बाहेर पडावं. कोरोनाच्या काळात सुद्धा गाव गाड्याचा माणूस शेतामध्ये राबत होता आणि तुम्ही मात्र अजून मास्क लावून आपल्याला काय होईल का झालं तर आपल्या संपत्तीचा काय करायचं? या चिंतेने ते स्वतःची काळजी घेत आहेत. आता तुम्ही जनतेचे काळजी घ्या असे सदाभाऊ खोत म्हणाले.
आता नववा महिना लागला का?
तसेच मनसे आणि भाजपच्या युतीबाबत बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, राज ठाकरेंनी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये लावा रे तो व्हिडिओ म्हटलं हे जे सगळे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या टाळ्या वाजवत होती.आता त्यांनी तो व्हिडीओ बंद केला आणि गाडा रे यानां मातीत म्हटल्याबरोबर ते भाजपकडे निघाले लगेच अशा बोंब मारायला हेच लागले. मग आता का पोटात कळा सुटायला लागल्या? तेव्हा हसू येत होतं आता काय नववा महिना लागला का? म्हणून रडू येऊ लागलं असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले. तसेच राणा दाम्पत्याबाबत बोलताना खोत म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणी कुठे उभं राहावं हा ज्यांचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु ज्या पद्धतीने राजद्रोहाचा गुन्हा दाखल त्यांच्यावर केला तो गुन्हा चुकीचा होता. तसेच न्यायालयाने शासनाला फटकारलं या सरकारच्या विरोधात जर कोण बोललं तर त्याला आम्ही तुरुंगात टाकून त्याच्यावर कोणत्या पद्धतीचे गुन्हे लावू, अशी भूमिका हे घेत आहेत, या राज्यांमध्ये खाकी आणि खादी या दोघांची युती झालेली आहे. त्यामुळे जनता आता सध्या वाऱ्यावरती आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेनेला सांगावं लागतं
तसेच आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावही त्यानी सडकून टीका केली आहे. गावामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळ्या आडनावाने लोक ओळखले जातात पवार, देशमुख, पाटील, जाधव अशा नावाने लोक ओळखले जातात. पण काही लोकांना सांगावं लागतं की मी पाटील आहे. मात्र लोकांच्या लक्षात आले की ही पाटील यांची गेलेली आहे आणि म्हणून ते आता दाखवण्यासाठी धडपड आहे. असे सदाभाऊ खोत म्हणाले.
खडसेंनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न
तसेच एकनाथ खसडे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले, खडसे साहेब हे जेष्ट नेते आहेत. त्यांनी बहुजनांच्या नेतृत्व अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या राज्यांमध्ये त्यांनी केलेला आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये ते राष्ट्रवादी मध्ये गेले आणि त्यांना आता दिसायला लागलं हे सगळे काशीस धवून आणलेले आहेत, तसेच मी आदर करतो त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु भारतीय जनता पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे. तळागाळातल्या जनतेचा पक्ष आहे. तळागाळातील जनतेला आणि कार्यकर्त्यांना मानसन्मान देणारा पक्ष आहे.असे सदाभाऊ खोत म्हणाले.