Sambhaji Raje | सध्या सॉफ्ट हिंदुत्व आहे का? संभाजीराजे यांनी एकदम स्पष्टपणे मांडलं मत
Sambhaji Raje | संभाजीराजे यांनी आज एका कार्यक्रमात पुरोगामी विचारापासून, सॉफ्ट हिंदुत्व, मराठा आरक्षण या विषयांवर आपली मत स्पष्टपणे मांडली. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी काय सिद्ध केलं पाहिजे, त्या बद्दलही सांगितलं.
नाशिक (चंदन पूजाधिकारी) : “आज सत्यशोधक समाजाच अधिवेशन होतं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी हा समाज उभा केला. समाज हा जातीसाठी नाही. जातीच्या पलीकडे तो एक विचार आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाला चालना दिली. सगळे मुद्दे पटत होते असं नाही. आर्य समाजाचेही ते पुरस्कर्ते होते. आज राजकारणात जे पुढारी आहेत, त्यांना माझी एकच विनंती आहे की, शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी विचार नुसता कागदापुरता मर्यादीत राहू नये. आपल्या महापुरुषांनी जो महाराष्ट्र घडवलाय, शिवाजी महाराजांपासून शाहू, फुले, आंबेडकरांचा पुरोगामी विचार जिवंत ठेवायचा असेल, तर तुम्ही कुठल्याही पक्षात असलात तरी चालेल. तुम्हाला राजकरण करायच असेल, तर शिवाजी महाराजांसोबतच शाहू, फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार पुढे नेण्याशिवाय पर्याय नाही” असं संभाजीराजे म्हणाले.
“भाषणापुरता विचार मर्यादीत न राहता, हा विचार सर्वांपर्यंत रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मी सर्व पुढाऱ्यांना सूचना केलीय” असं संभाजीराजे यांनी सांगितलं. हिंदुत्वाच्या मुद्यावरही संभाजीराजेंना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले की, “सध्या सॉफ्ट हिंदुत्व चालू नाहीय. हिंदुत्वात एक्स्ट्रीमीजम सुरु आहे” “शाहू महाराजांनी हातावर शंकर कोरले हे सॉफ्ट हिंदुत्व, जे ठराविक लोक प्रॅक्टिस करतायत त्यांना हिंदूत्व म्हणायचे का ? असा सवालही संभाजीराजेंनी केला. मराठा आरक्षणाच्या मुद्यारवही संभाजीराजेंनी भाष्य केलं. “मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकार तपासून पाहत आहे. शिवाजी महाराजांनी 18 पगडजात, 12 बलुतेदार यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. शाहू महाराजांनी 1902 साली बहुजनांना आरक्षण दिले ते अनुसूचित जाती जमाती, ओबीसी आणि मराठा समाज समाविष्ट होता” असं संभाजीराजे म्हणाले. मराठा आरक्षणाबद्दल संभाजीराजे काय म्हणाले?
माझ मत आहे की, “गरीब मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे त्यावर लाईन द्यायला हवी. माझी मागणी होती, की सामाजिक मागास कसे सिद्ध कराल? सर्वेक्षण करायला पाहिजे यावर कोणी बोलत नाही. न्यायालयाने तुम्ही सामाजिक मागास नाही असे म्हंटले, ते सिद्ध करायला लागेल आणि मग या पुढच्या गोष्टी आहेत जरांगेची मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यावे. हे तुमच्या कायद्यात बसत असेल तर सरकारने द्यावे त्याला माझा पाठिंबा असेल, पण कुठेतरी अडकवण्यासाठी काहीतरी करू नये” असं संभाजी राजे म्हणाले.