पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात कुणाला घाबरतात?, संजय राऊत यांनी घेतली दोघांची नावे; चर्चांना उधाण

"मोदींसारखे खोटारडे नेते या देशाने पाहिले नाही. या देशातील ८० टक्के जनता उपाशी आहे. तुम्ही नाटकं कशाला करता? आनंदाच्या क्षणी हा माणूस रडला. निवडणुका आल्या की हा माणूस रडतो. पुलावामामध्ये ४० जवान मारले गेले. यांच्या डोळ्यात टिपूस आला नाही. महाराष्ट्रात दीड वर्षात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण पंतप्रधानाच्या डोळ्यात अश्रू आले नाही", अशी टीका संजय राऊतांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात कुणाला घाबरतात?, संजय राऊत यांनी घेतली दोघांची नावे; चर्चांना उधाण
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 9:29 PM

नाशिक | 23 जानेवारी 2024 : शिवसेना ठाकरे गटाची आज नाशिकमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर सडकून टीका केली. “मोदींसारखे खोटारडे नेते या देशाने पाहिले नाही. या देशातील ८० टक्के जनता उपाशी आहे. तुम्ही नाटकं कशाला करता? आनंदाच्या क्षणी हा माणूस रडला. निवडणुका आल्या की हा माणूस रडतो. पुलावामामध्ये ४० जवान मारले गेले. यांच्या डोळ्यात टिपूस आला नाही. महाराष्ट्रात दीड वर्षात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण पंतप्रधानाच्या डोळ्यात अश्रू आले नाही. पण निवडणूका आल्या की यांच्या डोळ्यात अश्रू येत असतील. मगरीचे अश्रू आहेत. रामाने यांच्यावर डोळे वटारले असतील तुम्ही का आला म्हणून”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

“रामराज्य येत असताना महाराष्ट्रात गद्दारांचं राज्य आलं. तख्त बदल दो, राज बदल दो, गद्दारोंका राज बदल दो राम मंदिराच्या निमित्ताने घराघरात अक्षता वाटल्या. घरा घरात गेले. अरे अक्षता कसले वाटताय. १५ लाख रुपये वाटा. तुम्ही वचन दिलं होतं. तुम्ही १५ लाख घेऊन आला असता तर आम्ही तुमच्या अक्षता स्वीकारल्या असत्या”, असं संजय राऊत म्हणाले.

‘देशात मोदी फक्त दोघांना घाबरतात’

“या महाराष्ट्रात नव्हे देशात मोदी फक्त दोघांना घाबरतात, शेतकऱ्यांना आणि ठाकऱ्यांना. फक्त दोघांना. शेतकरी आणि ठाकरे. बाकी कुणाला घाबरत नाही. संपूर्ण शेतकरी कष्टकरी उद्धव ठाकरे यांच्या पाठी ठामपणे उभे आहेत. परवा मोदी आले होते. काय केलं. शेतकऱ्यांना अटक केली. शेतकऱ्यांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवलं. शेतकऱ्यांना जवळ येऊ दिलं नाही. अशा पद्धतीने जुलमी राज्य सुरू आहे”, असा दावा संजय राऊतांनी केला.

“शिवसेनेने म्हणे हिंदुत्व सोडलं. त्यामुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली. शिवसेनेने विचार सोडला. अरे अडीच वर्ष त्याच सरकारमध्ये मंत्री म्हणून चरत होता ना. मग अडीच वर्षात जे खोके जमा केले ते शिवसेनेच्या तिजोरीत जमा केला. शिंदे हा विराट जनसमुदाय पाहा. हे महाराष्ट्राचं आजचं चित्र आहे. हा उसळलेला उद्रेक आहे. महाराष्ट्रात आपल्याला राम राज्य आणायचं आहे. शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे. गद्दारांना गाडायचं आहे. गद्दारांचं राज्य उलथून टाकायचे आहे. त्यांना जमिनीत ५० फूट असं गाडायचं आहे की गद्दारीचं नावच निघणार नाही. फक्त शिवसेनाच राहील”, असं संजय राऊत म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.