“सरकार कुठल्या परिस्थितीत जातीय दंगली घडू देणार नाही”; संभाजीनगर दंगलीवर ‘या’ मंत्र्याने दिले स्पष्टीकरण
सरकारबद्दल बोलताना ते म्हणाले की, सरकार कुठल्या परिस्थितीत जातीय दंगली घडू देणार नाही. मला असं वाटतं की, सरकार याबाबतीत कठोर पावले उचलणार आहे, आणि कोणत्याही परिस्थितीत जातीय दंगली घडू देणार नाही असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
नाशिक : राज्यात कुठेही आणि काहीही घडलं तरी विरोधकांकडून भाजपलाला कचट्यात उभा करायचं हा एक प्रयोग राज्यात विरोधकांकडून चालू असल्याची टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांवर केली आहे. दीपक केसरकर यांनी यावेळी एमआयएम आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दंगलीवरूनही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, या प्रकरणात कोण कोण दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई ही होणारच आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
तर छत्रपती संभाजीनगरच्या नामाकरणावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना एकदा साधं नाव बदलायचा विषयही तुम्ही काढला नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
ज्या वेळेला सत्ता गेली त्यावेळेला कॅबिनेटची बैठक बोलवून तुम्ही संभाजीनगर नाव देतात त्यातही दहा कॅबिनेटचे मंत्री गैरहजर असतात अशी जोरदार टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना छेडले आहे. तुम्ही बाळासाहेब यांचे विचार सोडले त्याचबरोबर तुम्ही हिंदुत्वही सोडलं आहे. मात्र मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेने हेच दाखवून दिलं आहे की, काँग्रेसच्या मतांसाठी तुम्ही किती लाचार झाला आहात.
मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांच्यावरही सडकून टीका केली आहे. आज रामनवमी आहे, त्यावरूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचवण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाकरे गटाबरोबर राम राहू शकत नाही. ज्यांनी हिंदुत्व सोडले आहे त्यांच्यासोबत राम राहू शकणारच नाही. कारण खरं तर हिंदुत्वाचे प्रतीक हे राम आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी आपण हिंदुत्वापासून लांब गेलो हे त्यांनी स्वतः पंतप्रधान यांच्यासमोर कबूल केले आहे. आणि महाराष्ट्रात पुनर्प्रस्थापित युती करू असं आश्वासन त्यांनी दिल्लीत होते. मात्र मुंबईला आल्यावर मात्र त्यांच्याकडून अश्वासन पाळलं गेले नाही असा असंही दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आम्हाला दोष देण्यापुरतेच तेवढेच वापरत आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी करून काय मिळवले असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
त्याचवेळी त्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले की, पुन्हा जर सावरकरांचा अपमान केला तर आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही असा इशारा त्यांनी राहुल गांधी यांना दिला पाहिजे होता असा सल्लाही त्यांनी त्यांना दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीविषयी बोलताना त्यांनी सरकार काय भूमिका घेणार याबाबतही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
यावेळी सरकारबद्दल बोलताना ते म्हणाले की, सरकार कुठल्या परिस्थितीत जातीय दंगली घडू देणार नाही. मला असं वाटतं की, सरकार याबाबतीत कठोर पावले उचलणार आहे, आणि कोणत्याही परिस्थितीत जातीय दंगली घडू देणार नाही असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
छत्रपती संभाजीनगर दंगलीविषयी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सीसीयटीव्हीसमोर आले असतील तर पोलीस या प्रकरणी तपास करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.