Nashik : एसटी बस बंद असल्यानं चक्क म्हशीवर स्वार होत चिमुरडी शाळेला निघाली! व्हिडीओ व्हायरल

Nashik Viral video of School Girl : राज्य सरकारनं सगळे कोरोनाचे निर्बंध उठवले आहेत. शाळाही पूर्ण क्षमतेनं ऑफलाईन सुरु झालेल्या आहेत. अशातच एसटी संपाचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पाहायला मिळतोय.

Nashik : एसटी बस बंद असल्यानं चक्क म्हशीवर स्वार होत चिमुरडी शाळेला निघाली! व्हिडीओ व्हायरल
चक्क म्हशीवर स्वार होत शाळेला निघालीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 3:28 PM

नाशिक : एक मुलगी चक्क म्हशीवर बसून शाळेला निघाल्याचा व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या नाशकात व्हायरल झालाय. व्हायरल व्हिडीओची संपूर्ण नाशकात (Nashik girl viral video) सध्या चर्चा रंगली आहे. एसटी संप (ST employee strike) असल्यामुळे ही मुलही चक्क शाळेचं दप्तर घेऊन म्हशीवरुन शाळेला जायला निघाल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. एकीकडे ऊन वाढलंय. दुसरीकडे राज्य सरकारनं सगळे कोरोनाचे निर्बंध उठवले आहेत. शाळाही पूर्ण क्षमतेनं ऑफलाईन सुरु झालेल्या आहेत. अशातच एसटी संपाचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून पाहायला मिळतोय. एसटी संपावर अद्याप तोडगा पूर्णपणे निघालेला नाही. अशातच आता नाशिकच्या लासलगावमधला एक हटके व्हिडीओ समोर आलाय. एसटी नसल्यामुळे शाळेला कसं जायचं, असा प्रश्न महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सतावतो आहे. त्यात लासलगावमधील या विद्यार्थीनीचा व्हिडीओ सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय.

व्हिडीओमध्ये काय दिसलं?

व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी म्हशीवर बसली आहे. म्हशीवर बसून या मुलीनं शाळेला जात असल्याचं म्हटलंय. म्हशीवर बसून शाळेत का जातेय, असा प्रश्न केल्यावर या मुलीन एसटी बस नसल्याचं कारण सांगितलं आहे. रस्त्याच्या मधोमध म्हशीला हाकत ही मुलगी शाळेला जायला निघाल्याचं पाहायला मिळतंय. चक्क म्हशीच्या पाठीवर स्वार होत शाळेसाठी निघालेल्या या मुलीचा हा भन्नाट व्हिडीओ वेगानं व्हायरल होतोय.

पाहा Viral व्हिडीओ :

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल

एसटीचं सरकारमध्ये विलिनीकरण करावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागण्यांसाठी गेल्या साडेपाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. दुसरीकडे सरकारनं एसटीचं विलीनकरण सरकारमध्ये करणं शक्य नसल्याचंही स्पष्ट केलंय. तसंच 31 मार्चपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं. त्याचबरोबर जे कर्मचारी कामावर रुजू होणार नाही, त्यांच्यावर 1 एप्रिलपासून कारवाई केली जाईल, असा इशाराही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. इतकंच काय तर कंत्राटी पद्धतीनं एसटीत कर्मचाऱ्यांची गरजेप्रमाणे भरतीही केली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.

या सगळ्या संपाच्या अनुशंगानं सुरु असलेल्या घडामोडींमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर शाळेत कसं जायचं? असा प्रश्न निर्माण झाला. ग्रामीण भागातील एसटी सेवा बंद झाल्यानं विद्यार्थ्यांचे हाल झालेत. तर दुसरीकडे दररोज उन्हाचा पारा चढत असतांन राज्य सरकारने अन्य उन्हाळ्यात शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता शाळा गाठण्यासाठी प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. परिणामी आता तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करून एसटी कर्मचार्यांनी संप मागे घेत ग्रामीण भागातील एसटी सेवा सुरु करावी अशी मागणी होतेय. दरम्यान, या सगळ्या घडामोडींनी चक्क म्हशीवरुन शाळेला निघालेल्या मुलीनं सगळ्यांचंच लक्ष वेधलंय.

संबंधित बातम्या :

Nagpur Suicide | मृत्यूनंतरच्या जगाचं आकर्षण, नागपुरात 13 वर्षांच्या बलिकेची आत्महत्या

Maharashtra Kesri : महाराष्ट्र केसरीच्या गदेचं पूजन; मोहोळ कुटुंबाकडून दरवर्षी दिली जाते मानाची गदा

Onion Rate: कांदा दारचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर, 3 एकरावरील उभ्या पिकावर फिरवला नांगर

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.