Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींच्या राज्यात महिला सर्वाधिक अपमानित, भाजपचा पाच कलमी कार्यक्रम काय?; शरद पवार काय म्हणाले?

शिर्डीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचं शिबीर पार पडलं. आज या शिबीराचा दुसरा दिवस होता. या शिबीराची सांगता पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भाषणाने झाली. यावेळी शरद पवार यांनी भाजप आणि संघावर जोरदार हल्ला चढवला. देशाच्या परिस्थितीवरून पवार यांनी भाजपला धारेवर धरलं. भाजपच्या सत्ता काळात महिला सर्वाधिक अपमानित झाल्या. भाजपचा पाच कलमी कार्यक्रम हा केवळ संघासाठीचा असल्याचंही पवार म्हणाले.

मोदींच्या राज्यात महिला सर्वाधिक अपमानित, भाजपचा पाच कलमी कार्यक्रम काय?; शरद पवार काय म्हणाले?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 6:27 PM

शिर्डी | 4 जानेवारी 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मोदी यांच्या राज्यात या देशात महिला सर्वाधिक अपमानित झाल्या असल्याचा हल्लाबोलच शरद पवार यांनी केला आहे. तसेच संघ आणि भाजपचा पाच कलमी कार्यक्रम वाचून दाखवत भाजपपासून सावध राहण्याचे आवाहनही शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचं कार्यकर्ता शिबीर शिर्डीत पार पडलं. यावेळी शरद पवार यांनी हा हल्ला चढवला.

देशातील लहान घटकांना मदत न करण्याची भाजपची भूमिका आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांना मानतो. पण ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांच्या मनात शाहू, फुले, आंबेडकर नाहीत. तर गाय, गोमूत्र ही त्यांची भूमिका आहे. आरएसएसची विचारधारा आणि त्यांचे कार्यक्रम यालाच महत्त्व दिलं जात आहे. कारण त्यांना हिंदुत्वावर आधारीत फॅसिझम आणण्याचा आहे. त्यासाठी त्यांनी पाच कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे, असं शरद पवार म्हणाले.

पवारांनी सांगितलेला भाजपचा पाच कलमी कार्यक्रम

सर्व क्षेत्रात खासगीकरण, अनिर्बंध नफेखोरीला प्रोत्साहन

खोट्या प्रचारातून मुस्लिम समाजाबाबत द्वेष वाढवणं, धार्मिक द्वेष निर्माण करणं

न्याय व्यवस्था, ईडी, सीबीआय, प्रसारमध्यमं, रिझर्व्ह बँक अशा स्वायसत्ता ताब्यात ठेवणं

मनुवादी वर्चस्ववाद वाढवणं, धर्माच्या नावाखाली देशाला मध्ययुगीन कालखंडाकडे नेणं

आक्रमक राष्ट्रवाद मांडणं. त्यात प्रामुख्याने पाकिस्तानविरोधी आक्रमकता दाखवायची आणि जनतेमध्ये वातावरण निर्माण करायचं… हे फॅसिझमला उत्तेजन देण्याचं काम सुरू आहे.

महिला सर्वाधिक अपमानित

मोदींच्या राज्यात महिला सर्वाधिक अपमानित झाली. शरमेने मान खाली घालावी लागते अशा प्रकारचं उदाहरण मणिपूरचं आहे. आदिवासी महिलांवरही देशात अत्याचार होत आहेत. आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहे. त्याचा आनंद आहे. एका लहान समाजाची भगिनी देशाची राष्ट्रपती होऊ शकते. पण त्या पदाचा ते किती सन्मान करतात.

जुनं पार्लमेंट असताना नवीन पार्लमेंटची वास्तू तयार केली. पार्लमेंटचं पहिलं सेशन सुरू होतं, तेव्हा राष्ट्रपतीचं अभिभाषण सुरू होतं. हा आपला पायंडा आहे. पण नवीन पार्लमेंट बांधलं. त्याच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना बोलावलं नाही. त्यांचा सन्मान केला नाही. अशा किती तरी गोष्टी सांगता येतील. नवीन कायदे केले. त्यात महिलांना अधिक अधिकार आणि नोकरी देण्याची तरतूद केली. पण त्याची अंमलबजावणी 2029 ते 2030 मध्ये केली जाणार आहे. पार्लमेंटमध्ये बिल करायचं आणि चार वर्ष अंमलबजावणी करायची नाही, यावरून त्यांची बांधिलकी किती हे दिसून येतं, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.