Sharad Pawar : पवारांची आश्वासन पूर्तता; शिक्षण संस्थेला 1 कोटीचा निधी, 6 मुलींच्या आयुष्यातील काळोख होणार दूर

शरद पवारांनी दिलेल्या एक कोटीच्या निधीतून वैद्यकीय आणि कृषी शाखेत शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येकी तीन विद्यार्थींनींना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या सहा मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करेपर्यंत या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

Sharad Pawar : पवारांची आश्वासन पूर्तता; शिक्षण संस्थेला 1 कोटीचा निधी, 6 मुलींच्या आयुष्यातील काळोख होणार दूर
नाशिक येथे मंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त हेमंत टकले यांच्या उपस्थितीत एक कोटी रुपयांचा धनादेश श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 12:37 PM

नाशिकः राजकारण असो किंवा समाजकारण. दिलेले आश्वासन पाळले, तर त्या व्यक्तीचे नाव होते. अन्यथा प्रत्येक सभेत आश्वासनांची खैरात होते. लोक स्वप्न पाहतात. मात्र, पिढी उलटून गेली तरी त्याची पूर्तता होत नाही. याला अपवाद ठरली अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्थाय. या संस्थेला एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) 10 एप्रिल 2022 रोजी दिले होते. त्याची पूर्तता करण्यात आली. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त हेमंत टकले यांच्या उपस्थितीत नाशिक (Nashik) येथे एक कोटी रुपयांचा धनादेश श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पवार साहेबांनी हे आश्वासन पाळल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या वतीने आभार मानत यावेळी आनंद व्यक्त केला. या निधीमुळे सहा मुलींच्या आयुष्यातील शिक्षणाविनाचा दाटलेला काळोख दूर होणार आहे.

नेमके आश्वासन काय?

शरद पवार यांच्या हस्ते 10 एप्रिल रोजी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षागृहाचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी आपल्या भाषणात शरद पवार यांनी एक कोटीचा निधी देण्याचे जाहीर केले होते. या निधीतून वैद्यकीय आणि कृषी शाखेत शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील प्रत्येकी तीन विद्यार्थींनींना शिष्यवृत्ती देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले सांगितले होते. या निधीमुळे आता सहा मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करेपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या आयुष्यातील अज्ञानरूपी काळोख त्यामुळे मिटणार आहे.

अन् धनादेश केला सुपूर्द

अमरावती येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय कार्याध्यक्षा व मुंबई महापालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, प्रदेश सरचिटणीस बबन कनावजे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस हरीश सणस, प्रदेश उपाध्यक्ष बापू भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नलावडे आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मंत्रालयीन समन्वयक प्रसाद उकीर्डे आदी उपस्थित होते. इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.