‘मालेगाव बाह्यमधील तिसरा उमेदवार हा मंत्र्यांनी दिलेला डमी उमेदवार’, अद्वय हिरे यांचा दावा

मालेगाव बाह्य मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची सभा होणार असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अद्वय हिरे आणि मंत्री दादा भुसे यांच्यातील लढत चर्चेचा विषय आहे. हिरे यांच्या विरोधात ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. हिरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, भुसे यांच्या वाढलेल्या नाराजी वर्गाचा उल्लेख केला आहे. ठाकरे यांच्या सभेचा विजयावर मोठा प्रभाव पडेल, असा विश्वास हिरे यांनी व्यक्त केला आहे.

'मालेगाव बाह्यमधील तिसरा उमेदवार हा मंत्र्यांनी दिलेला डमी उमेदवार', अद्वय हिरे यांचा दावा
अद्वय हिरे
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 4:55 PM

मालेगाव बाह्य मतदारसंघांमध्ये मंत्री दादा भुसे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यात लढत होत आहे. याच पार्श्वीभूमीवर आज मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. अद्वय हिरे यांची प्रचाराची रणनीती आणि दादा भुसे यांचा वाढलेला नाराजी वर्ग यामुळे या लढतीकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. दरम्यान, निवडणुकीमुळे वातावरण तापलं असून मतदारसंघात अद्वय हिरे यांच्या विविध कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून सोशल मीडियावरून त्यांच्या विरोधात प्रचार सुरू आहे. या दरम्यान अद्वय हिरे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली आहे.

“उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे आमचा विजयाचा निकाल निश्चित आहे. तालुक्यातील जनता गुंडगिरीने त्रस्त आहे. लोकांना भय मुक्त वातावरण हवे आहे. ही निवडणूक सर्वसाधारण मतदारांनी हातात घेतली आहे. महाविकास आघाडीचा 200 ते 210 जागा जिंकून येतील, असा मला विश्वास आहे. त्यामुळे निश्चितच आम्ही सत्ता स्थापन करणार. लोकांच्या पोटात दुखत आहे म्हणून ऑडिओ क्लिप व्हायरल केल्या जात आहेत”, अशी टीका अद्वय हिरे यांनी केली.

‘…तर त्यांना अवघड होईल’, अद्वय हिरे यांचा इशारा

“AI चा जमाना आहे. त्यामुळे उद्या अशा पद्धतीचे व्हिडिओ देखील व्हायरल होतील. पण माझ्या नेत्याचा माझ्यावर विश्वास आहे विश्वास आहे. लोकांना एक्स्पर्ट हायर करायला लागतात. मला हायर करायची गरज नाही. मी त्यातील तज्ज्ञ आहे. मी देखील असे व्हिडिओ व्हायरल करायला लागलो तर त्यांना अवघड होईल”, असा इशारा अद्वय हिरे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

‘तिसरा उमेदवार डमी’

“ही लढत दोनच लोकांमध्ये आहे. तिसरा उमेदवार हा डमी उमेदवार आहे. तिसरा उमेदवार हा जय वीरू यांची जोडी आहे. मी मॅनेज होऊ शकत नाही. त्यांना पराभवाची भीती दिसत आहे म्हणून त्यांनी डमी उमेदवार उभा केला आहे”, अशी टीका अद्वय हिरे यांनी केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.