विलीनीकरणाचा आणखी एक बळी; नाशिकमध्ये संपकरी एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

चार-चार महिने पगार न मिळता, कमी पैशांमध्ये राब-राब राबलेल्या संपकऱ्यांचा धीर सुटत चालला आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा नाशिकमध्ये आला असून, आता आणखी एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राचा सरकारी प्रवास गाडा अक्षरशः थांबला आहे. ज्यांच्याकडे खासगी वाहने नाहीत आणि जिथे रेल्वे नाही, तिथे जाणे दुरापास्त झाले आहे. कोट्यवधी जनता या संपाने त्रस्त आहे, पण राज्य सरकारला यावर अजून तरी उपाय काढणे जमले नाही.

विलीनीकरणाचा आणखी एक बळी; नाशिकमध्ये संपकरी एसटी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
प्रातिनिधिक छायाचित्र.
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 2:30 PM

नाशिकः दिवाळीपासून संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे चार-चार महिने पगार न मिळता, कमी पैशांमध्ये राब-राब राबलेल्या संपकऱ्यांचा धीर सुटत चालला आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा नाशिकमध्ये (Nashik) आला असून, आता आणखी एका कर्मचाऱ्याने (employee) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शिवनाथ कापाडे असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकित होता. त्यामुळे राज्यभरात ठिकठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आगारामध्ये तर थांबलेल्या बसमध्ये स्वतःच्या बॅगचा बेल्ट काढून बसचालक संजय केसगिरे यांनी आत्महत्या केली. अहमदनगरमध्ये एसटी ड्रायव्हरने आपले जीवन असे संपवले. मात्र, चार महिन्यांपासून जास्त दिवस होऊन एसटीचा संप अजूनही सरकारला मिटवता आला नाही. याबद्दल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे.

नेमकी घटना काय?

नाशिकमधील शिवनाथ कापाडे हे गेल्या आठ वर्षांपासून शहापूर आगारात नोकरीला होते. गेल्या चार महिन्यांपासून इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे ते सुद्ध एसटीच्या विलीनीकरणासाठी आंदोलनात उतरले. त्यामुळे आधीच बिकट असलेली आर्थिक परिस्थिती आणखी खालावली. दुसरीकडे हाताला काम नाही. सरकार नमते घेत नाही. हे सारे पाहता त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही बातमी संपकरी कर्मचाऱ्यांना समजली. तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय स्फोटक होत्या. मात्र, सरकारच्या थंड हालचालीमुळे असे अजून किती कर्मचारी गमावावे लागणार, असा सवाल विचारला जातोय.

सरकारचे घोर अपयश

एसटी विलीनीकरणावर सरकारने आपली नकारघंटा सुरू ठेवलीय. पगारवाढ करण्याच्या नावाखालीही कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे समोर आले. अनेक जणांचे हजार, दोन हजार रुपयांनी पगार वाढवले. त्यामुळे संपकरी इरेस पेटले. त्यामुळे महाराष्ट्राचा सरकारी प्रवास गाडा अक्षरशः थांबला आहे. ज्यांच्याकडे खासगी वाहने नाहीत आणि जिथे रेल्वे नाही, तिथे जाणे दुरापास्त झाले आहे. कोट्यवधी जनता या संपाने त्रस्त आहे, पण राज्य सरकारला यावर अजून तरी उपाय काढणे जमले नाही. हे सरकारेच घोर अपयश असल्याची भावना व्यक्त होतेय.

इतर बातम्याः

पर्यावरण मंत्र्यांना अंधारात ठेवून वादग्रस्त उड्डाणपुलाला घाईघाईत मान्यता; नाशिकमध्ये पुन्हा आंदोलन धुमसणार!

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.